सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे.
प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी‘‘होमिओपॅथी स्वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !
संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे
निरामय आरोग्यासाठी प्रौढ व्यक्तींना सरासरी ७-८ घंटे झोप आवश्यक असते. ‘झोप अजिबात न लागणे, अपेक्षित आणि आवश्यक घंटे झोप न लागणे, झोपेतून रात्री जागे होणे अन् परत झोप न लागणे, पहाटे अवेळी जाग येणे’, या सर्व लक्षणांना ‘निद्रानाश’, असे म्हणतात. पुरेशी झोप न झाल्यामुळे दिवसा झोप येणे, थकवा येणे, चिडचिड, निरुत्साह असे दुष्परिणाम दिसून येतात.
१. निद्रानाश टाळण्यासाठी करावयाचे सर्वसाधारण प्रयत्न
अ. आरामदायक अंथरुण/गादी आणि उशी वापरणे
आ. रात्री झोपायला जायची वेळ एकच ठेवणे
इ. झोपण्यापूर्वी १ घंटा गरम पाण्याने आंघोळ करणे
ई. कॉफी टाळणे
उ. दिवसा झोप टाळणे
ऊ. झोपण्यापूर्वी किमान १ घंटा टीव्ही, मोबाईल, संगणक यांचा वापर टाळणे
ए. झोपण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात अन्नग्रहण टाळणे
ऐ. झोपण्याच्या वेळी मोठे आवाज आणि चकचकीत प्रकाश (bright lights) टाळणे
ओ. सक्रीय रहाणे, योगासने करणे
औ. ताणाचा यशस्वी सामना करण्याची क्षमता निर्माण करणे
अं. शिथिलतेसाठी ध्यानधारणा करणे
२. होमिओपॅथीची औषधे
२ अ. कॉफिया क्रूडा (Coffea Cruda)
२ अ १. झोप न येण्याचे पुढीलपैकी एखादे कारण असणे
अ. एखादी चांगली बातमी ऐकणे
आ. मनात अनेक विचार आल्याने मन उद्विग्न होणे
२ अ २. तान्ह्या मुलांमधील निद्रानाश
२ अ ३. लहान मुलांमधील दात येण्याच्या काळातील निद्रानाश
टीप : हे औषध घेत असतांना आहारात कॉफी घेऊ नये.
२ आ. नक्स व्हॉमिका (Nux Vomica)
२ आ १. झोप न येण्याचे पुढीलपैकी एखादे कारण असणे
१. अति प्रमाणात कॉफी, चहा किंवा मद्य यांचे सेवन करणे
२. बौद्धिक ताण असणे
३. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने न वाटणे
२ इ. सल्फर (Sulphur)
तळपायाची आग होत असल्यामुळे झोप न लागणे; लागली तरी गुदमरल्यासारखे होऊन जाग येणे
२ ई. ॲकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)
अतिशय काळजी, अस्वस्थता आणि मरणाची भीती यांमुळे झोप न येणे
२ उ. पल्सेटिला निग्रिकन्स (Pulsatilla Nigricans)
२ उ १. झोप न येण्याचे पुढीलपैकी एखादे कारण असणे
अ. अवेळी आणि अधिक खाल्ल्यामुळे अपचन होणे
आ. मनात अनेक विचार असणे
२ उ २. पुढे वाकून किंवा एका बाजूला टेकून बसल्यास झोप लागणे
२ उ ३. गुंतागुंतीची स्वप्ने पडणे
२ ऊ. कॅम्फर (Camphor)
चिंताग्रस्त असल्याने मनाची उत्तेजित स्थिती राहिल्यामुळे झोप न येणे
२ ए. आर्निका मोन्टाना (Arnica Montana)
२ ए १. झोप न येण्याचे पुढीलपैकी एखादे कारण असणे
१. मुकामार, शारीरीक दुखापत होणे
२. अतीश्रम होणे
२ ए २. झोपल्यावर अंथरुण खूप कडक वाटणे
२ ऐ. हायोसायमस नायगर (Hyoscyamus Niger)
२ ऐ १. झोप न येण्याचे पुढीलपैकी एखादे कारण असणे
१. प्रेमात अपयशी होणे
२. ‘व्यवसायात फजिती झालेली नसतांना, ती झाली आहे’, असे वाटणे
३. राग, चिडचिड, मत्सर यांमुळे मनामध्ये तीव्र अस्थिरता असणे
२ ऐ २. त्यातही झोप लागल्यास बडबडणे किंवा हसणे
२ ओ. ओपियम (Opium)
१. झोपायला गेल्यावर अंथरूण खूप गरम वाटणे
२. अंथरुणात असतांना दूरचेही आवाज स्पष्टपणे ऐकू आल्यामुळे झोप न लागणे
२ औ. पॅसिफ्लोरा इन्कार्नाटा मूळ अर्क (Passiflora Incarnata Mother tincture)
१. वर दिलेल्या ‘१ ते ९’ औषधांपैकी ‘लक्षणांनुसार आपल्यासाठी लागू पडणारे औषध’ शोधून ते घ्यावे. त्याच्या जोडीला पॅसिफ्लोरा इन्कार्नाटा मूळ अर्कही घ्यावे.
२. ‘लक्षणांनुसार आपल्यासाठी लागू पडणारे औषध’ न सापडल्यास केवळ पॅसिफ्लोरा इन्कार्नाटा मूळ अर्क घ्यावे.
सूत्र क्र. ‘२ औ’ मधील १ आणि २ या दोन्ही परिस्थितींत या औषधाचे ३० थेंब रात्री झोपतांना घ्यावे. नियमित शांत झोप लागू लागली की, हे औषध घेणे थांबवावे.
३. बाराक्षार औषध
३ अ. कॅलियम फॉस्फोरिकम् (Kalium Phosphoricum 6x)
या औषधाच्या ४ गोळ्या कोमट दूध किंवा कोमट पाण्यात विरघळवून रात्री झोपण्यापूर्वी घ्याव्या.