बद्धकोष्ठता (Constipation) या आजारावरील होमिओपॅथी औषध

Article also available in :

प्रत्‍यक्ष आजारांवर स्‍वउपचार चालू करण्‍यापूर्वी‘‘होमिओपॅथी स्‍वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्‍यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे आणि डॉ. अजित भरमगुडे
होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

सप्ताहात ३ पेक्षा कमी वेळा शौचाला होणे, शौच शुष्क आणि कडक असणे, शौच करायला कठीण असणे, शौच करतांना वेदना होणे, तसेच शौच अपूर्ण झाल्याची जाणीव असणे, याला ‘बद्धकोष्ठता’ असे म्हणतात. अयोग्य आहाराची सवय, हे बद्धकोष्ठतेचे प्रमुख कारण होय.

डॉ. अजित भरमगुडे
डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

१. बद्धकोष्ठता होऊ नये यासाठी करावयाचे प्रयत्न

१ अ. शौचाची जाणीव झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, तत्परतेने शौचास जावे.

१ आ. प्रतिदिन तहान लागण्याच्या प्रमाणानुसार किमान ८-९ पेले पाणी प्यावे.

१ इ. प्रतिदिन आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करावा.

१ ई. आहारात भाज्या आणि फळे यांचा पुष्कळ वापर करावा.

१ उ. कॉफी पिणे टाळावे.

२. औषधे

२ अ. नक्स व्हॉमिका (Nux Vomica)

२ अ १. अतिप्रमाणात कॉफी, चहा, मद्य ग्रहण करणे, तसेच बौद्धिक ताण या कारणांमुळे होणारी बद्धकोष्ठता

२ अ २. थोडे अन्न खाल्ले, तरी पोट भरल्यासारखे जाणवणे

२ अ ३. शौचाला वरचेवर जावे लागणे आणि गेल्यावर शौचाला अत्यल्प होणे

२ आ. ॲल्यूमिना (Alumina)

२ आ १. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवण केल्यामुळे ॲल्युमिनियमचा अंश पोटात गेल्यामुळे होणारी बद्धकोष्ठता

२ आ २. शौच अतिशय कडक असून रुग्णाला पुष्कळ जोर लावून कुंथावे लागणे

२ आ ३. प्रत्येक २ दिवसांनी शौचाला होणे

२ आ ४. पाठीमध्ये तीव्र अशा जळजळणार्‍या वेदना होणे

२ इ. ब्रायोनिया अल्बा (Bryonia Alba)

२ इ १. शौचाला कोरडे, कडक होणे, शौच करतांना जळजळ होणे

२ इ २. बद्धकोष्ठता आणि त्याबरोबर डोकेदुखी असणे

२ इ ३. नेहमी घशाला कोरड पडून पुष्कळ तहान लागणारा, पुष्कळ वेळाने पुष्कळ पाणी पिणारा

२ इ ४. उष्ण हवामानामध्ये सर्वच व्याधींचा अधिक त्रास होणारा

२ ई. ओपियम (Opium)

२ ई १. शौचाला गोल, कडक असे काळे खडे पडणे

२ ई २. अनेक दिवस शौचाला जाण्याची इच्छा न होणे

२ ई ३. नेहमी सतत झोप येत असणारे

२ उ. प्लंबम् मेटॅलिकम् (Plumbum Metallicum)

२ उ १. रंगकाम करणार्‍या कामगारांमध्ये शिशाच्या विषबाधेमुळे होणारी बद्धकोष्ठता

२ उ २. संगमरवरासारखे पांढरे शौच होणे

२ उ ३. पोटामध्ये तीव्र ओढल्याप्रमाणे वेदना होणे, बेंबी आत मणक्याकडे ओढली जात आहे, असे वाटणे

२ उ ४. हिरड्यांच्या कडा निळ्या पडणे

२ ऊ. सॅनिकुला ॲक्वा (Sanicula Acqua)

२ ऊ १. बद्धकोष्ठतेचा आजार पुष्कळ कालावधीपासून (chronic) असणे

२ ऊ २. ४ ते ५ दिवस शौचाला न होणे

२ ऊ ३. शौच बाहेर पडणे कठीण होणे आणि त्यासाठी घाम येईपर्यंत कुंथावे लागणे

२ ए. सल्फर (Sulphur)

२ ए १. शौचाला जाण्याची इच्छा पुन:पुन्हा होणे; परंतु शौचाला जाऊन समाधान न होणे

२ ए २. कडक, गाठी असलेले आणि अपुरे शौचाला होणे

२ ए ३. गुदद्वाराच्या भागात जळजळ होणे

२ ए ४. प्रतिदिन सकाळी ११ वाजता गळून गेल्यासारखे वाटणे

२ ऐ. थुजा ऑक्सिडेंटॅलिस (Thuja Occidentalis)

२ ऐ १. शौचात कडक, काळे गोळे पडणे

२ ऐ २. शौच बाहेर पडत असतांना पुन्हा आत जाणे

२ ओ. मॅग्नेशियम म्युरियाटिकम् (Magnesium Muriaticum)

२ ओ १. लहान मुलांना दात येत असतांना होणारी बद्धकोष्ठता

२ ओ २. शौचातून शेळीच्या लेंड्यांप्रमाणे खडे पडणे आणि त्याचे गुदद्वाराशी तुकडे पडणे

२ ओ ३. शौच आरंभी कडक आणि नंतर नरम असणे

Leave a Comment