नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

हिंदूंनो, धर्मनिरपेक्ष भारतावर हिंदु राष्ट्राची गुढी उभारण्यासाठी प्रतिबद्ध व्हा !
‘सध्या कधी नव्हे, एवढा सनातन धर्माच्या जागृतीच्या संदर्भात अनुकूल काळ आहे. याचे एक उदाहरण; म्हणजे या वर्षी १४४ वर्षांनी आलेल्या प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील महाकुंभमेळ्यात ६६ कोटी हिंदूंनी गंगास्नान करणे. याचा अर्थ सनातन धर्माचा अभिमान बाळगणार्या भारतातील अनुमाने ५० टक्के हिंदूंनी गंगास्नान केले. हा सनातनी हिंदूंमधील जागृतीचा परमोच्च काळ आहे.
सध्या सनातन धर्म, संस्कृती, धर्मग्रंथ, कालगणना, संस्कृत, गोमाता, गंगा, मंदिरे आदी हिंदु धर्माचे मानबिंदू संकटात आहेत. जर खर्या अर्थाने भारतात आलेली धर्मग्लानी दूर करायची असेल, तर ‘धर्मनिरपेक्ष भारतात सनातन धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करणे’, हाच चिरस्थायी उपाय आहे. त्यामुळे जागृतावस्थेत आलेल्या हिंदूंमध्ये आता संवैधानिक धर्मनिरपेक्षतेने भारताच्या आणि सनातन धर्माच्या केलेल्या परम अधोगतीविषयी जागृती करणे अन् विद्यमान धर्मनिरपेक्ष भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित करण्यासाठी उद्युक्त करणे अत्यावश्यक आहे; म्हणूनच हिंदूंनो, सनातन धर्मशास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या युगादि तिथीला भारतावर हिंदु राष्ट्र स्थापित करण्यासाठी प्रतिबद्ध व्हा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था