परात्पर गुरु डॉक्टरांनी संत आणि साधक यांच्यासमोर एक प्रयोग केला. त्यात त्यांनी एका प्लास्टिकच्या पांढर्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात एका हाताची एकेक करून पाचही बोटे बुडवली. त्या वेळी पाण्याच्या रंगात उत्तरोत्तर पालट दिसून आला. त्यासंदर्भातील विश्लेषण येथे दिले आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
पाण्यात बोटे बुडवल्यावर पाण्याच्या रंगात टप्प्याटप्प्याने झालेले पालट
अ. प्रथम तर्जनी पाण्यात बुडवणे : पाण्याचा रंग फिकट गुलाबी दिसणे
आ. तर्जनी आणि मध्यमा पाण्यात बुडवणे : पाण्याचा रंग आणखी गुलाबी दिसणे
इ. तर्जनी, मध्यमा आणि अनामिका पाण्यात बुडवणे : पाण्याचा रंग आणखी गुलाबी दिसणे
ई. तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी पाण्यात बुडवणे : पाण्याचा रंग आणखी गुलाबी दिसणे
उ. पाचही बोटे पाण्यात बुडवणे : रंग आणखी गुलाबी दिसणे
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हाताची बोटे पाण्यात
बुडवल्यावर त्यात पाण्याचा रंग गुलाबी होण्यामागील सांगितलेले कारण !
हाताच्या करंगळीपासून अंगठ्यापर्यंतच्या सर्वच बोटांत पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रथम तर्जनी पाण्यात बुडवल्यावर तर्जनीमधून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वामुळे पाण्याचा रंग फिकट गुलाबी होतो. नंतर तर्जनीसह मध्यमा, अनामिका आणि करंगळी असे एकेक बोट पाण्यात बुडवत गेल्यावर प्रत्येक बोटातून प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व पाण्यात येत गेल्याने पाण्याचा गुलाबीपणा उत्तरोत्तर वाढत जातो. पाण्यात बोटे बुडवणार्या व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीप्रमाणे रंग निरनिराळा दिसतो.
३. वरील प्रयोगाच्या संदर्भात श्री. राम होनप
यांनी विचारलेला प्रश्न आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर
प्रश्न : सत्संगात उपस्थित असलेल्या काही जणांसमोर वरील प्रयोग केला, तेव्हा तुम्ही पाण्यात एकेक बोट बुडवल्यावर पाण्यात रंग हळूहळू दिसू लागला. हा प्रयोग पूर्ण झाल्यावर अन्य उपस्थित असलेल्यांसमोर हाच प्रयोग दुसर्यांदा करण्यात आला, तेव्हा तुम्ही भांड्यातील पाण्यात बोटे बुडवण्याआधीच पाण्याच्या वर मला सूक्ष्मातून गुलाबी रंग दिसत होता. त्यामागील कारण काय ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : माझ्या शरिरातून सातत्याने पंचतत्त्वांचे प्रक्षेपण होत असते. त्याचा हा परिणाम होता.’
– श्री. राम पद्माकर होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्लास्टिकच्या भांड्यातील पाण्यात
त्यांच्या उजव्या हाताची बोटे बुडवल्यावर त्यामध्ये पंचतत्त्वांच्या स्तरांवर लक्षात आलेले पालट
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
टीप – बोटे बुडवलेल्या पाण्यात पृथ्वी, आप, तेज, वायू या तत्त्वांचे प्रमाण वाढल्याने त्या त्या तत्त्वाच्या गुणाची अनुभूती अधिक प्रमाणात आली. याउलट आकाशतत्त्व निर्गुणाच्या जवळचे असल्याने बोटे बुडवल्यावर आकाशतत्त्वाची निर्गुणता अल्प झाल्याने नाद अल्प ऐकू आला.
क्रमाक्रमाने बोटांना येणारा गंध : करंगळीपासून तर्जनीपर्यंत गंध कमी होत गेला आणि अंगठ्याला सर्वांत न्यून प्रमाणात गंध आला.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |