सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित धर्मश्री प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान सोहळा

Article also available in :

 

कार्यक्रम

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्त आयोजित धर्मश्री प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान सोहळा

स्थळ

सुकुर पंचायत हॉल,
होली फॅमिली हायस्कूल जवळ,
पर्वरी, बार्देश, गोवा.

दिनांक ‍व वेळ

३०.११.२०२४
शनिवार
सायं. ५ वा.

क्षणचित्रे

गोवा येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सव 
आणि सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न !

या सोहळ्याचा आरंभ दीपप्रज्वलन, तसेच वेदमंत्रपठणाने सोहळ्याला प्रारंभ झाला. प्रारंभी प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे ७५ दिव्यांनी औक्षण करण्यात आले आणि यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे आणि सनातन संस्थेचे विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांच्या हस्ते प.पू. स्वामींचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तपोभूमी कुंडई येथील पीठाधिश्वर ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांचा आशीर्वचनपर व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला.

सुकुर पंचायत सभागृह, पर्वरी गोवा येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याच्या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, गोव्यातील आमदार श्री. चंद्रकांत शेट्ये, आमदार श्री. प्रेमेंद्र शेट, आमदार श्री. उल्हास तुयेकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यांसह या सोहळ्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातनच्या संत पू. दिपाली मतकर, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

सनातन संस्था निर्मित ‘ई-बूक’चे प्रकाशन !

या वेळी प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सनातन संस्था निर्मित ‘कुंभपर्व माहात्म्य’ या मराठी भाषेतील ‘ई-बुक’, ‘कुंभपर्व माहात्म्य’ या हिंदी भाषेतील ‘ई-बुक’, तर नामजप कोणता करावा ?’ या मराठी भाषेतील ‘ई-बूक’चे प्रकाशन, आणि ‘सनातन आश्रम दर्शन’ या व्हिडिओचे लोकार्पण करण्यात आले.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांचे वक्तव्य

सनातन संस्था हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गेल्या २५ वर्षांच्या काळात जिहादी, कम्युनिष्ट, अर्बन नक्षलवादी आदींचा प्रखर विरोध सहन करून अग्निदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो. आज ‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना’ म्हणून सनातन संस्था कार्य करत आहे. केंद्रीय गृह मंत्रालय सिद्ध केलेल्या ‘सी.ए.ए.’ कायद्याच्या प्रक्रियेत सनातन संस्थेचा सहभाग होता. वक्फ संशोधन विधेयक तयार करण्याच्या प्रक्रियेतही सनातन संस्थेने केलेल्या सूचना स्वीकारल्या गेल्या आहेत.

महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा यांचे वक्तव्य

महाराष्ट्राप्रमाणे गोवा राज्यानेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याची मागणी या वेळी केली. सर्व राज्यांनी जर गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्यास गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाल्याशिवाय रहाणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

गोव्याचे पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे यांचे वक्तव्य

सनातन संस्था ही सनातन धर्माचे रक्षण आणि मानवी मूल्याचे रक्षण करण्याचे महान आणि पवित्र असे कार्य करत आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी धर्मरक्षणाच्या कार्यालाही हातभार लावला पाहिजे. गोव्याची ओळख पूर्ण ‘सन, सँड आणि सी’ (समुद्रकिनारे) अशी होती. पर्यटन खात्याने गोव्याची ही ओळख बदलण्याचा प्रयत्न गोवा सरकारने सुरू केला आहे. गोवा सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील कार्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी श्री सप्तकोटेश्वर मंदिराची पुर्नर्बांधणी केली.

सनातन संस्थेच्या कार्यामुळे हजारो लोक तणावमुक्त आणि व्यसनमुक्त बनले ! – श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री

प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचे कार्य महर्षि वशिष्टाप्रमाणे अखंड असे धर्मरक्षणाचे कार्य केले आहे. महाराजांची साधना आणि कार्य यांमुळे असंख्य जिवांच्या जीवनात चांगले पालट होऊन आज राष्ट्रभक्त निर्माण होत आहेत. सनातन संस्थेने हिंदु धर्माचे पुनर्स्थानेचे विलक्षण असे कार्य केले आहे. या कार्यामुळे हजारो लोक तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवन जगू लागले आहेत. सनातनच्या कार्यामुळे धर्म आणि अध्यात्म यांचे रक्षण झालेले आहे, असे उद्गार केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी काढले.

गोवा सरकार देव, देश आणि धर्म रक्षणाचे कार्यासाठी कटीबद्ध ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

देवाला महत्त्व दिले, तर धर्म जागृत राहिल आणि धर्म जागृत राहिला तर देश जागृत राहिल. यासाठी गोवा सरकार देव, देश आणि धर्म रक्षणाचे कार्यासाठी कटीबद्ध आहे. सनातन संस्थेने कठीण प्रसांगांना सामोरे जाऊन आज देशभरात भरीव असे कार्य केले आहे. सनातन संस्थेचा गोव्यातील रामनाथी येथील आश्रमातून हिंदु धर्माचे रक्षणाचे महत्त्वाचे कार्य चालते. सनातन संस्थेचा ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक हिंदूंवर देश आणि विदेशात होत असलेल्या अत्याचार, तसेच हिंदू करत असलेले चांगले कार्य याची निरंतर माहिती देऊन हिंदुत्वाच्या जागृतीचे कार्य करत आहे. प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या सारख्या अनेक राष्ट्रसंतांमुळे भारतात देव, देश आणि धर्म रक्षणाचे कार्य चालत आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनी केले.

सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घेतलेले हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

काही वर्षांपूर्वी ‘हिंदु’ हे शब्द उच्चारणे कठीण होते. ‘सनातन’ उच्चारणे त्याहून कठीण होते. अशा विपरीत परिस्थितीत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासारखा एक सत्पुरुष, महात्मा निष्ठेने येथे (गोवा येथे) येऊन उभा रहातो आणि आपल्या तपाला आरंभ करतो. हा सनातन धर्माचा शंखनाद, हा केवळ शंखनाद नसून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठीचा शंखनाद आहे. सनातन संस्थेचे वाढणारे कार्य पहाता, ‘हे कार्य आता थांबणार नाही, ते उत्तरोत्तर वाढतच जाईल आणि एक दिवस हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय साकार करेल, याची ग्वाही मिळते. सनातनचे २५ वर्षांचे कार्य पहाता हिंदु राष्ट्र साकार होण्याची वेळ आली आहे, असे गौरवोद्गार ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी काढले. ते रामराज्याचे ध्येय उराशी बाळगणार्‍या ‘सनातन संस्थे’चा रौप्य महोत्सव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. प्रसंगी १३५० लोकांची उपस्थिती होती.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज पुढे म्हणाले की, कितीही उदात्त विचार असले, तरी शक्ती नसेल, तर ते व्यर्थ आहेत. शक्ती नसेल, तर र्‍हास होतो. सनातन संस्थेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे सनातनने २५ वर्षांत केवळ धर्माचा प्रसार केला नाही, तर प्रतिकार करणारा समाज निर्माण केला. त्याचे बाळकढू समाजाला पाजले. समर्थ रामदासस्वामी यांनी हेच कार्य केले आहे. एकेकाळी ‘सनातन’ हा शब्दही कुणी उच्चारत नव्हते. आता मात्र अगदी राजधानी देहलीत ‘सनातन बोर्ड’ स्थापन करण्याची मागणी होत आहे. हा ‘सनातन’ शब्द गोव्याहून (म्हणजे ‘सनातन संस्था’ या नावामुळे) देहलीत गेला आहे. ही ‘सनातन’ या शब्दाची ताकद आहे. २५ वर्षांत सनातन संस्थेसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली, अनेक संकटे आली. आज सनातनच्या तपाचा (म्हणजे व्यापक धर्मकार्याचा) परिणाम आपल्याला पहायला मिळत आहे. सनातन संस्थेविषयी जेवढे गोडवे गावे, तेवढे थोडेच आहे. 

शुभहस्ते

डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री
गोवा

विशेष उपस्थिती

श्री. श्रीपाद यसो नाईक

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री

श्री. रोहन अशोक खंवटे

पर्यटनमंत्री, गोवा

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सनातन संस्था

सन्मान सोहळ्यातील विशेष कार्यक्रम

लोकार्पण

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या माहितीपटाचे लोकार्पण !

 

सनातन संस्थेच्या २५ वर्षांतील तेजस्वी धर्मकार्याचे अवलोकन !

स्‍वामीजींचे मार्गदर्शन

प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचे ओजस्वी अन् जाज्वल्य मार्गदर्शन !

सन्मान सोहळ्यातील विशेष कार्यक्रम
लोकार्पण

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या माहितीपटाचे लोकार्पण !

सनातन संस्थेच्या २५ वर्षांतील तेजस्वी धर्मकार्याचे अवलोकन !
स्‍वामीजींचे मार्गदर्शन

प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचे ओजस्वी अन् जाज्वल्य मार्गदर्शन !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष धर्मश्री प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचा परीचय

प.पू. महाराज पूर्वी आचार्य किशोरजी व्यास म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी काशी येथे दर्शनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांनी रामायण, भागवत आदींवर सहस्रो प्रवचने दिली आहेत. ते रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभागी होते. ‘श्रीकृष्ण सेवानिधी न्यास’, ‘संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल’ आदींद्वारे प्रचंड धर्मकार्य त्यांनी केले आहे.

आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारी
25 years of Sanatan Sanstha
सनातन संस्था
आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारी
25 years of Sanatan Sanstha
सनातन संस्था
भ्रमणभाष क्रमांक

+91 93709-58132

1 thought on “सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित धर्मश्री प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान सोहळा”

  1. देव, देश आणि धर्मासाठी कायम लढत राहणार…

    Reply

Leave a Comment