सनातन गौरवदिंडी

|| सस्नेह निमंत्रण ||

सनातन गौरवदिंडी

सनातन धर्म म्हणजे वैश्विक धर्म ! या धर्मातील यज्ञांचा उद्देश विश्वशांती आहे. या धर्माची उपनिषदे म्हणतात, ‘विश्व हेच एक कुटुंब आहे.’ या धर्मातील समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘चिंता करितो विश्वाची !’ संत ज्ञानेश्वर पसायदानामध्ये विश्वकल्याणासाठी प्रार्थना करतात ! अशा या वैश्विक सनातन धर्माचा गौरव कारणे, हे सनातन धर्मातील संप्रदाय, आध्यात्मिक संस्था, संघटना, सामाजिक संस्था, धर्मप्रेमी, राष्ट्रनिष्ठ इत्यादींचे धर्मकर्तव्यच ठरते ! म्हणूनच सनातन धर्माच्या प्रसारासाठी समर्पित असलेल्या सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘सनातन गौरवदिंडी’चे आयोजन केले आहे.

दिनांक

रविवार, २१ एप्रिल २०२४

वेळ

सायं. ५ वाजता

स्थळ

भिकारदास मारुती मंदिर (महाराणा प्रताप उद्यान) – विश्रामबागवाडा – अलका टॉकिज चौक – स्वा. सावरकर स्मारक – सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन, पुणे.

धर्मप्रेमी म्हणून या गौरवदिंडीत उपस्थित रहा अन् धर्मकर्तव्य बजावा !

समाजव्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे, या गोष्टी ज्याच्यामुळे साध्य होतात तो धर्म.

श्री शंकराचार्यांनी केलेली धर्माची व्याख्या

दिंडीची क्षणचित्रे

हिंदूंनो, सनातन धर्माची अद्वितीय वैशिष्ट्ये समजून घ्या !

Leave a Comment