अनुक्रमणिका
‘वर्ष २०२० पासून जगभरातील लोकांवर ‘कोरोना विषाणूं’चे संकट आहे आणि २ वर्षे होत आली तरी अजूनही त्या विषाणूंची लागण लोकांना होतच आहे. त्यात आता कोरोनाचा नवीन प्रकार असलेला ‘ओमिक्रॉन’ नावाचा विषाणू पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘कोरोना विषाणूं’शी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी कोणता नामजप करावा आणि तो किती वेळ करावा ?’, यांची माहिती, तसेच त्या नामजपाचे ध्वनीमुद्रण ‘सनातन संस्थे’च्या ‘Sanatan.org’ या संकेतस्थळावर देण्यात आली. त्याचा लाभ जगभरातील अनेक लोकांना झाला. आता ‘ओमिक्रॉन’ या विषाणूंशी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी करावयाचा नामजप येथे देण्यात आला आहे.
१. नामजप
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’
हा ५ नामजपांचा एक नामजप आहे आणि तो येथे दिल्याप्रमाणे क्रमाने वारंवार म्हणावा.
२. नामजप करण्याचा कालावधी
अ. ‘ओमिक्रॉन’ या विषाणूंचा फैलाव एखाद्या प्रदेशात झाल्यास तेथील लोक त्या विषाणूंना बळी पडू लागतात. अशा वेळी त्या विषाणूंची लागण स्वतःला होण्यामध्ये प्रतिबंध करण्यासाठी हा नामजप प्रतिदिन १ घंटा करावा.
आ. त्या विषाणूंची लागण झाल्यास त्यांचे उच्चाटन होण्यासाठी हा नामजप लागण होण्याच्या तीव्रतेनुसार पुढील कालावधीकरिता प्रतिदिन करावा.
विषाणूंची लागण झाल्याची तीव्रता | नामजप करण्याचा कालावधी (घंटे) |
---|---|
१. मंद | १ ते २ |
२. मध्यम | ३ ते ४ |
३. तीव्र | ५ ते ६ |
३. नामजपाचे केलेले ध्वनीमुद्रण
नामजप ऐकून तो म्हणता येण्यासाठी त्याचे ध्वनीमुद्रण ऐका …
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’
४. ‘कोरोना विषाणू’ आणि ‘ओमिक्रॉन विषाणू’ यांच्यामध्ये जाणवलेले भेद
‘कोरोना विषाणूं’पेक्षा ‘ओमिक्रॉन विषाणू’ अल्प धोकादायक असल्याचे आधुनिक वैद्य (डॉक्टर्स) म्हणत आहेत.
कोरोना विषाणू | ओमिक्रॉन विषाणू | |
---|---|---|
१. सूक्ष्मता | अधिक सूक्ष्म | अल्प सूक्ष्म (टीप) |
२. लागण झाल्यास दिसणारी लक्षणे | ताप, सर्दी किंवा खोकला येणे | पचनसंस्था बिघडणे |
३. लक्षणे लगेच लक्षात येणे / न येणे | लक्षणे लगेच लक्षात न येणे | लक्षणे लगेच लक्षात येणे |
टीप – आपत्काळाची तीव्रता वाढत असतांना जसे वाईट शक्तींशी असलेला लढा सूक्ष्म युद्धाकडून स्थूल युद्धाकडे (तिसर्या महायुद्धाकडे) प्रवास करत आहे, तसे शारीरिक विकार उत्पन्न करणार्या विषाणूरूपी वाईट शक्तीही सूक्ष्माकडून स्थुलाकडे चालल्या आहेत. त्यानुसार ‘कोरोना विषाणूं’नंतर आलेले ‘ओमिक्रॉन विषाणू’ हेही अल्प सूक्ष्म आहेत.
५. प्रार्थना
‘येथे दिलेला नामजप गुरुकृपेने जगभरातील सर्वांना लाभदायक होऊन ‘ओमिक्रॉन विषाणूं’चा जगभरातील प्रभाव आटोक्यात यावा आणि त्यांचा प्रसार थांबावा, तसेच हा नामजप करण्याच्या निमित्ताने अनेकांना या आपत्काळात साधना करण्याचे गांभीर्य लक्षात येऊन त्यांच्याकडून साधनेला आरंभ व्हावा, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !’
६. साधकांना सूचना !
१. ज्या भागात ‘ओमिक्रॉन विषाणू’ विषाणूचे रुग्ण सापडले आहेत, तेथे ‘ओमिक्रॉन विषाणू’ला आध्यात्मिक स्तरावर प्रतिबंध करणारा नामजप करायचा असल्याने सध्या ‘कोरोना’वर प्रतिबंधात्मक आध्यात्मिक बळ देणारा नामजप (श्री दुर्गा-श्री दत्त-शिव यांचा एकत्रित नामजप) साधक थांबवू शकतात. ज्या भागात अद्याप ‘ओमिक्रॉन विषाणू’चा संसर्ग झालेला नाही, तेथे सध्या ज्याप्रमाणे ‘कोरोना’वर प्रतिबंधात्मक आध्यात्मिक बळ देणारा नामजप चालू आहे, त्याप्रमाणेच तो चालू ठेवावा.
२. ‘ओमिक्रॉन विषाणू’ अथवा ‘कोरोना’ यांवर प्रतिबंधात्मक आध्यात्मिक बळ देणारा जप झाल्यानंतर अन्य वेळी साधक सध्या ज्याप्रमाणे प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार शोधून नामजप करतात, त्याप्रमाणेच करावा.
३. यापूर्वी ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपांच्या संदर्भातील सूचना सर्वत्रच्या साधकांना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे तो नामजपही चालू ठेवायचा आहे.
– सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., गोवा. (७.१२.२०२१)
Disclaimer : At the outset, Sanatan Sanstha advises all our readers to adhere to all local and national directives to stop the spread of the coronavirus outbreak (COVID-19) in your region. Sanatan Sanstha recommends the continuation of conventional medical treatment as advised by medical authorities in your region. Spiritual remedies given in this article are not a substitute for conventional medical treatment or any preventative measures to arrest the spread of the coronavirus. Readers are advised to take up any spiritual healing remedy at their own discretion.
Plz send me on mail Omicron Protection Namajap
Namaskar,
Please download our ‘Sanatan Chaitanyavani’ audio app to listen to this chant audio continuously. Only one time download required. To download the app from Google playstore, visit – https://play.google.com/store/apps/details?id=sanatan.audios.musicplayer