सर्व साधकांसाठी महत्त्वाची सूचना
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार २.४.२०२० या
श्रीरामनवमीच्या दिवशी पुढील नामजप आणि स्तोत्रपठण करा !
२.४.२०२० या दिवशी श्रीरामनवमी आहे. या दिवशी श्रीरामाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार या दिवशी पुढील नामजप आणि स्तोत्रपठण करण्याची संधी साधकांना मिळत आहे. सर्वांनी भावपूर्णरित्या ते करून श्रीरामाची कृपा संपादन करावी.
१. सकाळी ११.३० ते दुपारी १२ या वेळेत पुढील नामजप करा !
श्रीरामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता श्रीरामाचा जन्म झाला असल्याने विश्वातील सर्व साधकांनी आपापल्या ठिकाणी बसून सकाळी ११.३० ते दुपारी १२ या कालावधीत पुढील नामजप करावा.
१ अ. सर्वांनी करावयाचा नामजप
‘श्रीराम जय राम जय जय राम ।
श्रीराम जय राम जय जय राम ॥
हरि मर्कट मर्कटाय ।
हरि मर्कट मर्कटाय ॥’
१ आ. नामजप करण्यापूर्वी पुढील प्रार्थना करा !
‘हे श्रीरामा, आज श्रीरामनवमीच्या दिनी आम्हा सर्व साधकांना तुझे चैतन्य अखंड मिळू दे. तुझी कृपादृष्टी आम्हा सर्वांवर सदोदित राहू दे. आमचा आध्यात्मिक त्रास दूर होऊन आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण होऊ दे. रामराज्य स्थापनेत येणार्या अडचणी दूर होऊन शीघ्रतेने रामराज्याची स्थापना होऊ दे, अशी तुझ्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे !’
१ इ. सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घरी अथवा आश्रमात नामजपासाठी बसतांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे (उदा. एकमेकांमध्ये १ मीटर अंतर ठेवणे, गर्दी होणार नाही, असे पहाणे) पालन होईल, असे साधकांनी पहावे.
२. या दिवशी दिवसभरात एकदा ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि ‘श्रीकृष्णाष्टकम्’ यांचे पठण करा !
श्रीरामनवमीच्या दिवशी सर्व साधकांनी दिवसभरात एकदा ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि ‘श्रीकृष्णाष्टकम्’ (आद्य शंकराचार्यकृत) यांचे पठण करावे. पठण करणे शक्य नसल्यास ते ऐकावे.
‘श्रीरामरक्षास्तोत्रा’ची संहिता (स्क्रिप्ट) आणि ऑडिओ https://www.sanatan.org/mr/a/522.html या लिंकवर (संगणकीय मार्गिकेवर) उपलब्ध असून साधक तेथे जाऊन तो ऐकू शकतात. ‘श्रीकृष्णाष्टकम्’ची संहिता (स्क्रिप्ट) आणि ऑडिओ खाली दिले आहे.
३. अन्य सूचना
अ. मासिक धर्म असलेल्या साधिका, तसेच सोयर आणि सुतक असलेले साधक वरील दोन्ही उपाय करू शकतात.
आ. साधक हा वेळ उपायांच्या कालावधीत धरू शकतात.
श्रीकृष्णाष्टकम् ।
भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं
स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनम् ।
सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं
अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् ॥ १ ॥
मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं
विधूतगोपशोचनन् नमामि पद्मलोचनम् ।
करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं
महेन्द्रमानदारणन् नमामि कृष्णवारणम् ॥ २ ॥
कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं
व्रजाङ्गनैकवल्लभन् नमामि कृष्णदुर्लभम् ।
यशोदया समोदया सगोपया सनन्दया
युतं सुखैकदायकन् नमामि गोपनायकम् ॥ ३ ॥
सदैव पादपङ्कजम् मदीय मानसे निजं
दधानमुक्तमालकन् नमामि नन्दबालकम् ।
समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं
समस्तगोपमानसन् नमामि नन्दलालसम् ॥ ४ ॥
भुवो भरावतारकम् भवाब्धिकर्णधारकं
यशोमतीकिशोरकन् नमामि चित्तचोरकम् ।
दृगन्तकान्तभङिगनं सदा सदालिसङ्गिनं
दिने दिने नवन् नवन् नमामि नन्दसम्भवम् ॥ ५ ॥
गुणाकरम् सुखाकरङ् कृपाकरङ् कृपापरं
सुरद्विषन्निकन्दनन् नमामि गोपनन्दनम् ।
नवीनगोपनागरन् नवीनकेलिलम्पटं
नमामि मेघसुन्दरन् तडित्प्रभालसत्पटम् ॥ ६ ॥
समस्तगोपनन्दनम् हृदम्बुजैकमोदनं
नमामि कुञ्जमध्यगम् प्रसन्नभानुशोभनम् ।
निकामकामदायकन् दृगन्तचारुसायकं
रसालवेणुगायकन् नमामि कुञ्जनायकम् ॥ ७ ॥
विदग्धगोपिकामनोमनोज्ञतल्पशायिनं
नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवन्हिपायिनम् ।
किशोरकान्तिरञ्जितं दृगञ्जनम् सुशोभितं
गजेन्द्रमोक्षकारिणन् नमामि श्रीविहारिणम् ॥ ८ ॥
यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा
मया सदैव गीयतान् तथा कृपा विधीयताम् ।
प्रमाणिकाष्टकद्वयञ् जपत्यधीत्य यः पुमान्
भवेत्स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् ॥ ९ ॥
इति श्रीमच्छंकराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णम् ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥