‘कोरोना’ सारखी महासंकटे आणि साधना

आज सुद्धा लोकांना कोरोना संसर्गजन्य रोग आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे किंवा याच्या नैसर्गिकतेविषयी फारसे स्पष्ट समजलेले नाही. काही देशांत वैज्ञानिक तज्ञ याला मानवनिर्मित आपत्तीच समजत आहेत. मानवाच्या साहाय्याला उपयुक्त असलेल्या विज्ञानाच्या आधारावर मानवसमूहलाच हे नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याचे कारण म्हणजे,‘मानवाची तमोगुणी प्रवृत्ती’ होय. आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आपल्याला याच्या मागील धर्माचा दृष्टीकोन कोणता आहे आणि त्या संदर्भात शारिरीक, मानसिक, आध्यात्मिक स्तरावर कोणती सिद्धता करू शकतो हे आपण समजून घेऊ या.

आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की, आपत्ती म्हणजे काय, आपत्ती का येते, त्यावर उपाय काय आहे, कोणती साधना आणि कशी करावी, साधना करतांना गुरूंचे महत्त्व इत्यादी समजून घेण्याचा प्रयत्न करुया.

आपत्काळाचा अर्थ आणि त्याचे स्वरूप काय आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा https://www.sanatan.org/mr/a/71102.html

 

१. वर्तमानकाळातील आपत्ती

१ अ. जागतिक तापमान वाढीमुळे विश्‍वभरात समुद्राची पातळी वाढणे

जागतिक तापमान वाढीमुळे पाऊस पडण्याच्या प्रमाणात पालट होणे, हिमखंड आणि ‘ग्लेशियर’ यांचे वितळणे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणे असे प्रकार घडत आहेत. ‘ग्रीन हाऊस गॅस’ हा अशा प्रकारचा वायू असतो, जो पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून येथील तापमान वाढवतो. वैज्ञानिकांच्या अनुसार या वायूचे उत्सर्जन जर अशाच प्रकारे चालत राहिले, तर २१ व्या शतकात पृथ्वीचे तापमान ३ डिग्री ते ८ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढू शकते. जर असे झाले, तर त्याचा परिणाम अत्यंत घातक होईल. विश्‍वातील बर्फाच्छादित भाग वितळून जाईल.(शेवटी तोे समुद्रात मिसळून जाईल.) त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी कितीतरी पटीने वाढेल. समुद्रातील या परिवर्तनामुळे विश्‍वभरातील कितीतरी भाग जलमय होतील, प्रचंड हानी होईल. ही हानी कोणत्याही विश्‍वयुद्ध किंवा ‘ऐस्टेरॉइड’चे (लघुग्रहाचे) पृथ्वीशी धडकण्यामुळे होणार्‍या हानीपेक्षाही अधिक होईल. या चेतावणीला गांभीर्याने घेऊन इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांनी वर्ष २०१९ मध्ये ट्वीट करून म्हटले होते, ‘वर्तमानकाळातील देशाची राजधानी जकार्ता शहर पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्यामुळे आमच्या देशाची राजधानी ‘बोर्नियो’ द्विपावर स्थानांतरित होईल.’ लक्षात घ्या, एका देशावर त्याची राजधानीच पालटण्याची वेळी येईल. यावरून आपल्याला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल.

१ आ. ‘कोरोना’च्या प्रादुर्भावाने विश्‍वभरातील दुःस्थिती

जागतिक तापमानवाढीचे सूत्र भयावह असले, तरी ते संकट मानवासाठी भविष्यात वाढून ठेवलेले संकट आहे. वर्तमानकाळात आपण या संसर्गजन्य रोगाच्या आपत्काळातून जात आहोत. चीनपासून प्रारंभ झालेल्या या संसर्गजन्य रोगाचा २ मासात विश्‍वभरात प्रादुर्भाव झाला आहे. आजपर्यंत याच्या प्रकोपामुळे सहस्रो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि लक्षावधी लोक या रोगाच्या संसर्गाने बाधित झाले आहेत. आता ही संख्या कुठपर्यंत पोचेल, हे आपणाला भविष्यात दिसून येईल; परंतु आजपर्यंत तरी या संसर्गजन्य रोगावर कोणतेही औषध उपलब्ध झालेले नाही.’

 

२. आपत्काळ का येतो ?

कोरोनाची महामारी पहाता एखाद्याला प्रश्न पडेल, की मुळात ‘आपत्काळ का येतो ?’ याच्यामागे काही कार्यकारणभाव आहे का, असा प्रश्न कोणत्याही विचारी व्यक्तीला येईल. ‘मागील एका दशकांपासून संपूर्ण विश्‍वात नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढत असल्याचे आपण पहात आहोत. निसर्गाचे भयकारी सामर्थ्य अनुभवत आहोत. काही काळापूर्वी पूर्व दक्षिण-आशिया आणि जपान येेथे आलेल्या सुनामी, तसेच पाकिस्तान, हैती आणि चीन येथे झालेले भूकंप, त्यासमवेत ‘कटरिना’ आणि उत्तर अन् मध्य अमेरिका येथे आलेली अन्य चक्रीवादळे आदी नैसर्गिक संकटे आपण पाहिली आहेत. त्यांच्या तीव्रतेमुळे झालेला महाभयानक विध्वंस आणि जीवितहानी आमच्या मनावर बिंबली गेली आहे. निसर्गाच्या या कोपाचे कारण कोणते आहे, हे प्रथम आपण समजून घेतले पाहिजे.

२ अ. ‘मूलतत्त्ववादी (सेमेटिक)’ विचारधारेचे पंथ

इस्लाम किंवा ईसाई यांच्यामध्ये ‘पुण्याची’ अशी काही संकल्पनाच नाही. त्यांचे ‘प्रोफेट’ (पैगंबर) यांच्या मार्गावरून चालणे ‘पुण्यकारक’ मानले गेले आहे आणि त्या विरुद्ध कृती करणे ‘पाप’ मानले गेले आहे. या पंथांची धारणा आहे की, मानव सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व सृष्टी केवळ उपभोग घेण्यासाठीच आहे. त्यामुळे प्रकृतीला वेगळे मानून तिच्यामध्ये ढवळाढवळ करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. दुर्भाग्याने भारतातसुद्धा पश्‍चिमी देशातील लोकांद्वारा बनवली गेलेली शिक्षणपद्धती प्रचलित आहे. त्यामुळे भारतातसुद्धा आजच्या पिढीचीही तशीच प्रवृत्ती झाली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण करणे, जंगलांचा विनाश करणे आदी प्रवृत्ती वाढत आहेत. जंगलांचा नाश झाला, तर वन्यजीव नागरी वस्तींमध्ये प्रवेश करतील, वर्षा (पाऊस) अनियंत्रित होईल आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’मध्ये वाढ होईल. अशा प्रकारे मानवच आपत्तीला निमंत्रित करत आहे.

२ आ. मानवाचा स्वार्थ

मानवाची स्वतःच्या हिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्तीसुद्धा वाढली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी सागर आणि नदी यांच्या क्षेत्रावर अतिक्रमण करणे, पशूंची हत्या करणे, रासायनिक आणि जैविक शस्त्रे बनवणे, वायू आणि जल यांचे प्रदूषण करणारी रसायने (केमिकल्स ) बनवणे, उर्जेचा अतिरिक्त उपयोग करणे इत्यादी त्याची उदाहरणे आहेत. त्या कारणांमुळेही काही आपत्तींचा सामना करावा लागत आहे. वर्तमानकालाचा कोरोनाचा संसर्गजन्य रोगही याचेच एक उदाहरण आहे. याच स्वार्थी प्रवृत्तीमुळे आज सागरतटावर खार्‍या पाण्यात उगवणारे आणि सागरतटाचे नैसर्गिक रक्षण करणारे ‘मँग्रोव्ह’ जंगल नष्ट (तोड) करून त्या भूमीवर अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे सुनामीचा प्रकोप होऊन मानवाच्या सुरक्षेसाठी निसर्गाने दिलेले संरक्षण कवचही आम्हीच नष्ट करत आहोत. याचा भयंकर परिणाम आम्ही सुनामी आपत्तीच्या वेळी पाहिलासुद्धा आहे.

 

३. आध्यात्मिक दृष्टीकोनातून वैश्‍विक संकटे का येतात ?

कोरोनासारखा संसर्गजन्य रोग (महामारी) असो किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती असो, प्रत्येक जण आपापल्या परीने त्याची कारण शोधत असतात. जसे वैज्ञानिक असेल, तर ते आपला तर्क सांगतात की, ‘ही आपत्ती का आली आहे ?’, ‘याचा परिणाम काय होणार ?’ पत्रकार आपला तर्क लावतात; परंतु आपल्याला आपत्ती येण्यामागे आध्यात्मिक कारण (दृष्टीकोन) कोणते आहे, हे जाणून घ्यायचे आहे; कारण आध्यात्मिक दृष्टीकोनाविना आपणाला आपत्तींचे खरे कारण समजूनच घेता येणार नाही. हा भाग लक्षात न घेतल्याने मानव अशा संकटांवर लवकर मात करण्यात अपयशी ठरतो.

३ अ. आध्यात्मिक दृष्टीकोनाची विशेषता !

सृष्टीचे संचालन कोणत्याही देशाचे सरकार किंवा आर्थिक महासत्ता यांच्याद्वारे होत नाही. सृष्टीचे संचालन परमात्मा करतो. या संचालनाचे विज्ञान जर आम्ही समजून घेतले नाही, तर वैश्‍विक आपत्ती आणि त्यावरील योग्य उपाययोजना कसे समजू शकणार ? आपण सौभाग्यशाली आहोत की, आपल्या (हिंदु) धर्मग्रंथांमध्ये सृष्टी आणि तिचे संचालन या विषयाचे स्थूल अध्ययनासह सूक्ष्मतेने आणि स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे. ‘कौशिकपद्धति’ या ग्रंथामध्ये आपत्काळाच्या कारणांचे वर्णन आहे.

३ आ. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा कालचक्राचा नियम

युगपरिवर्तन हा ईश्‍वरनिर्मित सृष्टीचा एक नियम आहे. जी कोणतीही वस्तू उत्पन्न होते, ती काही काळापर्यंतच टिकते आणि शेवटी ती नष्ट होते. याला उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा नियम म्हटले जाते. उदाहरणार्थ हिमालय पर्वतशृंंखलेची उत्पत्ती झाली, ती काही काळापर्यंत राहील आणि शेवटी नष्ट होऊन जाईल. याचा अर्थ हा आहे की, जेव्हा या विश्‍वात कोणत्याही वस्तूची उत्पत्ती होते, काही काळ राहिल्यानंतर असे समजले जाते की, ती कोणत्याही क्षणी नष्ट होईल. केवळ निर्माता अर्थात् ईश्‍वर हाच चिरंतन आणि अपरिवर्तनीय आहे. या नियमानुसार आताचा काळ कालचक्रातील एक परिवर्तनाचा काळ आहे. दुसर्‍या शब्दात म्हणायचे झाले , तर आपत्तींमुळे सृष्टी तिचे संतुलन राखत आहे.

यामध्ये एक मार्ग आहे नैसर्गिक आपत्ती. नाशाच्या या प्रक्रियेमध्ये मानवजातही व्यवहार आणि आचरण यांद्वारा आपले योगदान देत आहे, जे युद्धाच्या रूपात सर्वनाश करते. याचे प्रमाण ७० टक्के असते. यामध्ये उत्पत्ती-स्थिती-लय (विनाश) या कालचक्राच्या नियमानुसार रज-तम गुणी जिवांची सर्वाधिक प्राणहानी होईल. त्यामुळे वातावरणाची एक प्रकारे शुद्धीच होणार. या काळाचा उल्लेख अनेक भविष्यवेत्त्यांनीही स्वत:च्या भविष्यवाणीत केला आहे.

३ इ. मनुष्याचे कर्म आणि समष्टी प्रारब्ध !

वर्तमान कलियुगात मनुष्याचे ६५ टक्के जीवन प्रारब्धानुसार आणि ३५ टक्के क्रियमाण कर्मानुसार असते. ३५ टक्के क्रियमाणाद्वारा झालेेल्या चांगल्या वाईट कर्मांचे फळ प्रारब्धाच्या रूपात त्याला भोगावे लागते. वर्तमानकाळात धर्मशिक्षण आणि धर्माचरण यांच्या अभावाने समाजातील अधिकांश लोकांचा स्वार्थ किंवा वाढता तमोगुण यामुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हानीचे कार्य होत आहे. ही चुकीची कर्मे संपूर्ण समाजाला भोगावी लागत आहेत; कारण की, समाज त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. अशा प्रकारे समष्टीच्या वाईट कर्मांची फळेसुद्धा त्याला नैसर्गिक आपत्तींच्या रूपाने सहन करावी लागत आहेत. जसे ‘आगीत सुक्यासमवेत  ओलेही जळते ’ त्याच प्रकारे हे आहे. याच प्रकारे समाज, धर्म आणि राष्ट्र यांचेसुद्धा समष्टी प्रारब्ध मानले जाते. समाजात आध्यात्मिक अपवित्रता वाढल्यामुळे वर्ष २०१३ पासून ते वर्ष २०२३ या कालखंडात मनुष्यजातीला कठीण समष्टी प्रारब्ध भोगावे लागेल.

३ ई. सृष्टी (प्रकृती) कसे कार्य करते ?

ज्या प्रकारे धूळ आणि धूर यांमुळे स्थूल स्तरावर प्रदूषण होते, त्याच प्रकारे बुद्धीअगम्य सूक्ष्म स्तरावर रज-तमाचे प्रदूषण होते. समाजात सर्वत्र पसरलेल्या अधर्म आणि साधनेचा अभाव यांमुळे मानवामध्ये रज-तम वाढले आहे. त्यामुळे वातावरणातही रज-तम वाढले आहे अन् सृष्टीचे (प्रकृतीचे) रक्षण केले जात नाही. रज-तम वाढण्याचा अर्थ आहे, सूक्ष्म स्तरावर संपूर्ण विश्‍वात बुद्धीअगम्य आध्यात्मिक प्रदूषण होणे. ज्या प्रकारे आम्ही ज्या घरात रहातो, तेथील धूळ-कचरा (घाण) वेळोवेळी स्थूलरूपाने काढत रहातो, त्याच प्रकारे सृष्टी म्हणजे प्रकृतीही सूक्ष्म स्तरावर वातावरणातील रज-तमाचे प्रदूषण दूर करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी कार्यरत होते. वास्तविक पहायचे झाल्यास जेव्हा वातावरणात रज-तमाचे पारडे जड होते, तेव्हा हे अतिरिक्त रज-तम मूलभूत ५ वैश्‍विक तत्त्वांच्या माध्यमातून (पंचमहाभूत) प्रभावशाली होते. या पंचमहाभूतांच्या माध्यमातून भूकंप, पूर, ज्वालामुखी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होते. मूलभूत पृथ्वीतत्त्व प्रभावित झाल्यामुळे त्याची परिणती भूकंपात होते. मूलभूत आपतत्त्व प्रभावित झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ (पूर येणे किंवा अतिरिक्त हिमवर्षा होणे इत्यादी) होते.

विश्वविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस आणि संतांद्वारे सांगितलेले भविष्य वाचण्यासाठी येथे भेट द्या. 

https://www.sanatan.org/mr/a/71109.html

४. आपत्तींचे कारण मनुष्याच्या स्वभावात लपलेले असणे !

विश्‍वासाठी आम्ही काय करू शकतो, हे आपल्याला ठाऊक नाही; परंतु आम्ही आपल्या आचरणाने विश्‍वाचे संतुलन बिघडणार नाही, एवढा प्रयत्न तरी नक्कीच करू शकतो. प्रत्येकाने हा प्रयत्न केल्यावर समाज आणि पुढे देश यांमध्ये सुधारणा आणू शकतो. स्वच्छता अभियानासाठी संपूर्ण देशामध्ये प्रयत्न केले गेले, ज्याचा लाभ सर्वांनाच झाला. हे याचे ताजे उदाहरण आहे.

आज विश्‍वाच्या आपत्तींचे कारण कुठे ना कुठे तरी आमच्या अयोग्य व्यवहाराशी निगडित आहे. लोक पृथ्वीवर उपलब्ध साधनांचा विचार न करता दुरुपयोग करत आहेत. अनेकांना ठाऊक असूनही ते अयोग्य व्यवहार करतात; कारण त्यांचा अहंकार आणि स्वार्थ त्यांना समाजाचा विचार करू देत नाही. तीव्र अहंकार आणि स्वार्थी वृत्ती असल्यामुळेे, ते सृष्टी, मनुष्य आणि अन्य जीव यांना त्रास देऊन अधिकांश वेळ केवळ आपल्याला सुख मिळवण्यामध्येच मग्न असतात. सरकारने कितीही प्रयत्न केले, कायदे बनवले, तरी जोपर्यंत व्यक्ती स्वतःच आपले समाजऋण जाणत नाही, तोपर्यंत परिवर्तन होणे शक्यच नाही.

समाजात जे लोक सृष्टी आणि समाज यांचा विचार करतात, ते हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच आहेत; परंतु त्यांचे जीवन आम्ही लक्षपूर्वक पाहिले, तर ते धर्माचरण करणारे, दयाळू स्वभावाचे, सर्वांप्रती प्रेम असणारे आहेत. त्यांच्या व्यवहारात व्यापकता आहे. त्यांचे आचरण आम्हा सर्वांना लोककल्याणाची कृती करण्याची प्रेरणा देते. त्यांना अधर्माचा परिणाम ठाऊक आहे. व्यक्तीचा आत्मसंयम हा कायद्याच्या दंडापेक्षाही अधिक प्रभावी असतो आणि तो केवळ धर्म समजून घेण्यामुळे आणि त्याला जीवनात उतरवल्यावरच येऊ शकतो.

 

५. आपत्काळ रोखणे शक्य आहे का ?

‘हे आमचे दुर्दैव आहे की, आपली संस्कृती ही निसर्गाची (प्रकृतीची) पूजा करणारी होती. गोमाता, गंगानदी, वड,पिंपळ, गंगासागर, कैलास पर्वत, मानसरोवर अशा प्रकारे आम्ही वृृक्षांपासून महासागरापर्यंत निसर्गाची पूजा करत होतो. आमची संस्कृती या भूमीला पवित्र भारतमाता मानणारी, दगडामध्येही भगवंत पाहून त्याचे पूजन करणारी होती; परंतु विदेशी शिक्षणपद्धत आणि कम्युनिस्ट विचारधारा यांच्यामुळे आपण तिला खालच्या दर्जेचे मानण्यास आरंभ केले. गोमातेला सांभाळण्यात आम्हाला लाभ-हानी दिसू लागली. हळू हळू आम्ही पश्‍चिमेच्या बाजूला आकर्षित होऊन आपल्या ऋषी-मुनीं आणि आपल्या पूर्वज यांच्याद्वारा सांभाळलेल्या आचरण पद्धतीला ठोकरले. विदेशात जे होत आहे, ते चांगले आणि आमचे वयस्कर व्यक्ती जे धर्माचे ज्ञान देतात, ते मागासलेले, असा मनोभाव सुद्धा प्रत्येक भारतीयाला संकेत देत राहिला, आता तरी जागे व्हा.

  • आमच्या मनोभावात केवळ परिवर्तन झाले नाही, तर ते खाली खाली ढासळत गेले आहे.
  • तुळशीचे स्थान मनीप्लांटने घेतले.
  • गोमातेचे स्थान कुत्र्यांनी घेतले.
  • आम्ही हात जोडून नमस्कार, राम-राम म्हणणे सोडून हस्तांदोलन (शेकहँड) करायला आरंभ केले.
  • वाढदिवसाच्या दिवशी आरती (औक्षण) करणे सोडून, केक कापणे आणि फुंकर मारून मेणबत्ती विझवणे आरंभ केले.
  • बाहेरून घरात येताना पाय धुणे, तर दूरची गोष्ट झाली. पादत्राणे घालूनच आम्ही संपूर्ण घरात फिरू लागलो.
  • काय खायचे, केव्हा खायचे, कसे खायचे, याचेही भान ठेवणेे आम्ही सोडून दिले.
  • उष्टे किंवा प्राण्याद्वारा हुंगलेले भोजन न खाणे, जन्म-मृत्युच्या वेळी सुतक पाळणे इत्यादी सर्व आमच्या आचारधर्माच्या गोष्टी आम्ही मागासलेपणाच्या नावावर ठोकरून दिल्या आहेत.
  • मंदिरात जाण्यात आम्हाला लाज वाटते.
  • खेद याचा आहे की, अज्ञानामुळे ज्या गोष्टी आम्ही सोडल्या आहेत, त्या गोष्टी आज विदेशात आत्मसात केल्या जात आहेत.
  • ‘स्वाइन फ्ल्यू’ आणि आता ‘कोरोना’ नंतर संपूर्ण विश्‍व ‘नमस्कार’ करत आहे.
  • ‘डिस्कव्हरी चॅनेल’ हा शोध सांगत आहेत की, जेव्हा लहान मुलांच्या वाढदिवसानिमित्त केकवर ठेवलेली मेणबत्ती विझवली जाते, तेव्हा त्याच्या मुखातून जिवाणु जाऊन केकवर पडतात, असा केक खाणे प्रकृतीसाठी अयोग्य आहे.
  • कोरोनानंतर आता बाहेरून आल्यावर लोक स्नान करू लागले आहेत, पुन्हा पुनः हातपाय धूत आहेत; परंतु आमच्याकडे ‘संध्या’ होत होती हे आम्ही का विसरलो? आमच्याकडे बाहेरून आल्यावर पादत्राणे काढून हातपाय धुवूनच घरात प्रवेश करत होतो. घरात असलो तरीही संध्याकाळी हातपाय, तोंड धुणे एक नित्य आचरण होते.

आमच्या धर्माचरणाला स्वच्छतेपर्यंतच सीमित ठेवले नव्हते, तर स्वच्छतेसह पावित्र्य कसे राखले जाईल, एवढ्या खोलवर आमचे चिंंतन होते.

परंतु आम्ही सर्व सोडले आणि आता त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत.

केवळ भोजनाची गोष्ट बघू या. आमच्या येथे केवळ बाह्य स्वच्छतेवर, तर पूर्ण लक्ष दिले जात होते; परंतु स्वयंपाक करतांना मनात पावित्र्य आणण्यासाठी देवाला नैवेद्य दाखवण्याची व्यवस्था होती. भोजनाला यज्ञाचे स्थान देऊन त्यापूर्वी प्रार्थना करत होतो. स्वयंपाक करणे, वाढणे, जेवणे इत्यादी सर्व विषयांमध्ये काही नियम होते. भोजनाचा एक अंश गोमाता आणि कुत्रा यांच्यासाठी काढला जात होता. एवढे विलक्षण आचरण सोडून, आज आम्ही आपली काय स्थिती केली आहे ? आजतर घरचे ताजे भोजन सोडून हॉटेल, स्वीगी, झोमॅटो हून येणारे खाणे आम्हाला अधिक आवडते. विवाह आणि समारंभात (पार्टीमध्ये ) आम्हाला उभे राहून जेवण्यात प्रतिष्ठेचे वाटते.  मग रोग तर होणारच ना? त्याचसह मानसिक आजार सुद्धा येणारच आहेत.

अजूनही वेळ आहे, आपल्याला आपला धर्म, संस्कृती यांच्याकडे परतावे लागेल आणि संपूर्ण विश्‍वाला मार्ग दाखवावा लागेल की, निसर्गाचे (प्रकृतीचे ) संतुलन करायचे असेल, तर पूर्वेकडे परत जाऊ या.

 

६. आपत्काळाची सिद्धता कशी केली पाहिजे ?

६ अ. आपत्काळाच्या दृष्टीने भौतिक तयारी

आपत्काळात वादळ, भूकंप आदींमुळे वीजपुरवठा बंद पडतो. पेट्रोल, डिझेल आदींचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहतूक-व्यवस्थाही कोलमडून पडते. त्यामुळे स्वयंपाकाचा गॅस, खाण्या-पिण्याच्या वस्तू आदी अनेक मास (महिने) मिळत नाहीत वा मिळाल्या, तरी त्यांचे ‘रेशनिंग’ होते. आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी उपलब्ध होणे जवळजवळ अशक्यच असते. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे भेट द्यावी : भावी भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी विविध स्तरांवर आतापासूनच सिद्धता करा !

६ आ. आपत्काळाच्या दृष्टीने आध्यात्मिक स्तरावर कोणती  व्यवस्था करायला पाहिजे ?

आगामी काळात येणार्‍या भीषण आपत्तींपासून रक्षण होण्यासाठी चांगली साधना करणे आणि भगवंताचे भक्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी आतापासून प्रयत्न आरंभ करा.

६ आ १. आमच्यावर देवतेची कृपादृष्टी होण्यासाठी आणि आपल्या सर्व बाजूंनी संरक्षण-कवच बनवण्यासाठी पुढे दिलेल्या गोष्टी प्रतिदिन कराव्यात. देवपूजा करावी. सायंकाळी देवता आणि तुळशीजवळ दिवा लावून त्याला नमस्कार करावा. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातील सर्व लोकांनी आरामात बसून स्वास्थ्य आणि संरक्षण-कवच प्रदान करणारा श्‍लोक / स्तोत्र पठण (उदा. रामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र, हनुमान चालीसा, देवीकवच आदी)करावे. रात्री झोपतांना अंथरूणाच्या चारी बाजूंना देवतांच्या नामजपाच्या सात्त्विक पट्टयांचे चौकोनी मंंडल करावे आणि संरक्षणासाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करावी.

६ आ २. आगामी तिसर्‍या  विश्‍वयुद्धाच्या वेळी सोडल्या जाणार्‍या परमाणू अस्त्रांच्या क्ष-किरणांचा वातावरणावर जो प्राणघातक प्रभाव पडेल, त्यापासून वाचण्यासाठी प्रतिदिन अग्निहोत्र करावे.

६ आ ३. कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी देवाने सुचवलेला नामजप अवश्य करा !

https://www.sanatan.org/mr/helpful_chant_in_corona

 

Disclaimer : At the outset, Sanatan Sanstha advises all our readers to adhere to all local and national directives to stop the spread of the coronavirus outbreak (COVID-19) in your region. Sanatan Sanstha recommends the continuation of conventional medical treatment as advised by medical authorities in your region. Spiritual remedies given in this article are not a substitute for conventional medical treatment or any preventative measures to arrest the spread of the coronavirus. Readers are advised to take up any spiritual healing remedy at their own discretion.

Leave a Comment