योगराज गुग्गुलु (गोळ्या)

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

योगराज गुग्गुलु हे उत्तम वातशामक औषध आहे.

 

१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग

हे उत्तम वातशामक औषध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

 

उपयोग औषध घेण्याची पद्धत कालावधी
वाताचे विकार, अर्धांगवायू (अर्धे शरीर लुळे पडणे), हात कापणे (थरथरणे), चक्कर येणे, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, आमवात (सांधे आखडणे, सुजणे आणि वेदना होणे) आणि हात-पाय दुखणे दिवसातून २ – ३ वेळा २ – २ गोळ्या कोमट पाण्यासह घ्याव्यात. १ ते ३ मास

 

२. सूचना

अ. गोळी चावून किंवा चूर्ण करून घेतल्यास तिची परिणामकारकता वाढते.

आ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात गोळ्यांचे चूर्ण घ्यावे.

 

३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !

मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण

 

४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !

हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’

–  वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

 

अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

Leave a Comment