वाळा चूर्ण थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे.
१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग
हे औषध थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
उपयोग | औषध घेण्याची पद्धत | कालावधी |
---|---|---|
अ. उष्णतेचे विकार (उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे, गळू (केसतोड) इत्यादी) | सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा वाळा चूर्ण १ कप दूध आणि १ चमचा खडीसाखर यांच्या मिश्रणासह घ्यावे. हे औषध घेतल्यावर साधारण १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. | ७ दिवस |
आ. मळमळ, उलटी, अतीसार (जुलाब) होणे आणि शौचावाटे रक्त पडणे | वाळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण, धनेपूड आणि बडीशेपेची पूड यांचे समभाग मिश्रण करावे. यातील १ चमचा औषध दिवसातून ३-४ वेळा वाटीभर गरम पाण्यातून घ्यावे. | ३ ते ४ दिवस |
इ. ताप | दिवसातून ३-४ वेळा पाव चमचा वाळ्याचे चूर्ण वाटीभर गरम पाण्यातून घ्यावे. | ३ ते ४ दिवस |
ई. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेचे विकार होऊ नयेत, यासाठी | पिण्याच्या १ लिटर पाण्यामागे अर्धा चमचा या प्रमाणात वाळ्याचे चूर्ण घालून ठेवावे. तहान लागेल, तेव्हा हेच पाणी प्यावे. | उन्हाळा आणि शरद ऋतू (ऑक्टोबर हीट) |
२. सूचना
अ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.’
३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !
मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण
४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !
हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)
अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’
Its very good ayurvedic treatment for patient