त्रिफला गुग्गुलु (गोळ्या)

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

त्रिफला गुग्गुलु हे औषध शरिरातील क्लेद (अनावश्यक ओलावा) आणि मेद (चरबी) नाशक आहे.

 

१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग

हे औषध शरिरातील क्लेद (अनावश्यक ओलावा) आणि मेद (चरबी) नाशक असून याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

 

उपयोग औषध घेण्याची पद्धत कालावधी
मूळव्याध, भगंदर (गुदभागी नळीच्या आकाराचा व्रण होऊन त्यात पू होणे), परिकर्तिका (फिशर), बद्धकोष्ठता, कोणत्याही प्रकारचे व्रण, गळू (केसतोड), लठ्ठपणा, मासिक पाळी अनियमित असणे, मासिक पाळीच्या वेळी अल्प रक्तस्राव होणे आणि विटाळात गाठी किंवा दुर्गंध असणे दिवसातून २ – ३ वेळा २ – २ गोळ्या १ चमचा मध / १ चमचा तूप / कोमट पाणी यांसह घ्याव्यात. १ ते ३ मास

 

२. सूचना

अ. गोळी चावून किंवा चूर्ण करून घेतल्यास तिची परिणामकारकता वाढते.

आ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात गोळ्यांचे चूर्ण घ्यावे.

 

३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !

मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण

 

४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !

हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’

–  वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

 

अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

1 thought on “त्रिफला गुग्गुलु (गोळ्या)”

Leave a Comment