सूतशेखर रस (गोळ्या)

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

सूतशेखर रस हे औषध पित्ताची मात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.

 

१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग

हे औषध पित्ताची मात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

 

उपयोग औषध घेण्याची पद्धत कालावधी
अ. आम्लपित्त, उलटी, पोटात दुखणे, पचनशक्ती अल्प असणे, अतीसार (जुलाब), तोंड येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, उचकी, दमा, ताप, शरीर क्षीण होणे, अंगावर पित्त उठणे, पित्तामुळे झोप न येणे, उच्च रक्तदाब या विकारांत, तसेच मेंदू आणि हृदय यांना हितकारक दिवसातून २ – ३ वेळा १ – २ गोळ्या २ घोट पाण्यासह /अर्धी वाटी दूध आणि १ चमचा तूप यांसह / अर्धा चमचा मध आणि १ चमचा तूप यांसह घ्याव्यात. गोळ्या घेण्यापूर्वी आणि नंतर १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. तात्कालिक किंवा ४० दिवस
आ. तीव्र पोटदुखी किंवा तीव्र डोकेदुखी प्रती अर्ध्या घंट्याने १ गोळी पाव चमचा मधात मिसळून घ्यावी. अधिकाधिक १० गोळ्या

 

२. सूचना

अ. गोळी चावून किंवा चूर्ण करून घेतल्यास तिची परिणामकारकता वाढते.

आ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात गोळ्यांचे चूर्ण घ्यावे.

इ. हातापायांची किंवा अंगाची आग होणे, अंगातून वाफा आल्याप्रमाणे वाटणे, डोळे गरम होणे अशी तीव्र उष्णतेची लक्षणे असल्यास हे औषध वापरू नये.

 

३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !

मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण

 

४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !

हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’

–  वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

 

अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

4 thoughts on “सूतशेखर रस (गोळ्या)”

    • नमस्कार मृदुला जी,

      सामान्यतः ही गोळी घेण्यापूर्वी व नंतर एक घंटा काही खाऊ नये. पण अन्न घ्यावे लागले तर किमान १५ मिनिटांनी घ्यावे.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply
    • Namaskar Prathmesh ji

      Changlya asthapanatun apan golya ghetlyas side effects nasnar. Tyamule aapan aplya vaidyankade vicharun tyanchya margadarshanakhali gheu shaktat.

      Aapli,
      Sanatan Sanstha

      Reply

Leave a Comment