कुटज घनवटी हे औषध अतिसार (जुलाब) नाशक आहे.
१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग
हे औषध अतिसार (जुलाब) नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
उपयोग | औषध घेण्याची पद्धत | कालावधी |
---|---|---|
अ. अतीसार (जुलाब), वारंवार शौचाला होणे आणि शौचाला पातळ होणे | दिवसातून ३ – ४ वेळा २ ते ४ गोळ्या वाटीभर कोमट पाण्यासह घ्याव्यात. | १ – २ दिवस |
आ. मूळव्याधीतून रक्त पडणे आणि रक्तप्रदर (योनीमार्गातून जास्त रक्तस्राव होणे) | दिवसातून २ – ३ वेळा १ – २ गोळ्या वाटीभर कोमट पाण्यासह घ्याव्यात. | १ मास |
२. सूचना
अ. गोळी चावून किंवा चूर्ण करून घेतल्यास तिची परिणामकारकता वाढते.
आ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात गोळ्यांचे चूर्ण घ्यावे.
३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !
मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण
४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !
हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)
अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’
प्रणाम वैद्य जी,
मला नेहमी थकल्या सारखे वाटते, शरीरात एनर्जी आणि उत्साह वाढवण्यासाठी काही औषध आहे का?
नमस्कार,
यासाठी तुम्ही स्थानिक वैद्यांना विचारून औषध घेतल्यास चांगले होईल.