ब्राह्मी चूर्ण

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

ब्राह्मी चूर्ण थंड गुणधर्माचे असून स्मृती वाढवणारे म्हणून प्रसिद्ध आहे.

 

१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग

हे औषध थंड गुणधर्माचे असून स्मृती वाढवणारे म्हणून प्रसिद्ध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

 

उपयोग औषध घेण्याची पद्धत कालावधी
अ. झोप न लागणे, आकडी (फीट) येणे, विस्मरण, डोके गरम असणे, राग येणे, चिडचिड होणे या विकारांत, तसेच बुद्धी वाढण्यासाठी ४ चमचे ब्राह्मी चूर्ण ४ वाट्या खोबरेल तेलात घालून उकळावे. हे तेल गाळून थंड झाल्यावर बाटलीत भरून त्यात १० ग्रॅम भीमसेनी कापूर बारीक करून घालावा. प्रतिदिन रात्री झोपतांना यातील १ – २ चमचे तेल डोक्याला लावून झोपावे, तसेच १ चमचा ब्राह्मी चूर्ण रात्री झोपतांना अर्धी वाटी कोमट पाण्यात मिसळून घ्यावे. ३ मास
आ. उष्णतेचे विकार, पित्त होणे आणि चक्कर येणे १ चमचा ब्राह्मी चूर्ण आणि १ चमचा खडीसाखर यांचे मिश्रण दिवसातून २ – ३ वेळा पाण्यासोबत घ्यावे. ७ दिवस
इ. मूत्रमार्गाची जळजळ होणे आणि लघवी गढूळ होणे दिवसातून २ – ३ वेळा १ चमचा ब्राह्मी चूर्ण १ चमचा खडीसाखर घालून कोमट पाण्यासह घ्यावे. ७ दिवस

 

२. सूचना

अ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.

 

३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !

मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण

 

४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !

हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’

–  वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

Leave a Comment