आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या वर्षी आषाढी एकादशी १७ जुलै २०२४ ला आहे. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.
कोणत्या तरी विशिष्ट वारीला, तिथीला अथवा कोणत्या तरी मासात विशिष्ट देवतांची स्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. तो काळ त्या देवतेचा काळ मानला जातो, उदा. श्रीविष्णूची एकादशी. वर्षभरात २४ वेळा येणार्या एकादशींच्या तुलनेत आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, अर्थात् पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली.
आषाढी एकादशी इतिहास
पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.
एकादशीचे व्रत कसे करावे ?
एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो.
व्रत करण्याची पद्धत
> आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे.
> एकादशीला प्रातःस्नान करायचे.
> तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे.
> हा संपूर्ण दिवस उपवास करायचा
> रात्री हरिभजन करत जागरण करायचे.
> आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे.
> या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
विठ्ठलाची आरती
उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते.
‘सनातन’च्या भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने आणि तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.
तर ऐकूया, “युगे अठ्ठावीस विटेवरी उभा” ही आरती …….
समाजाला शुद्ध आणि योग्य उच्चार, शुद्ध भाषा, शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि भावपूर्ण आवाजात म्हटलेले; तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संतांच्या अन् साधना करणार्या साधकांच्या सात्त्विक वाणीतून उच्चारलेले चैतन्यदायी ऑडिओ सर्वांना उपलब्ध व्हावेत, यासाठी सनातन संस्थेने ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ऑडिओ अॅप उपलब्ध केले आहे. या अॅपमध्ये सात्त्विक स्तोत्र, श्लोक, आरत्या आणि नामजप यांचा संग्रह आहे.
आजच ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करा !
पंढरपूरची वारी
अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर ! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी । संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ! पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर, कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णु यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो. अशी थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे.
१. ‘वारी’ या शब्दाच्या व्युत्पत्ती
अ. वार : अमरकोषात ‘वार’ हा शब्द ‘समुदाय’ या अर्थाने वापरला आहे. यावरून ‘भक्तांचा समुदाय’, असा ‘वारी’ शब्दाचा अर्थ काढता येतो.
आ. वारी : संस्कृत भाषेत ‘वारि’ म्हणजे पाणी. पाण्याचा प्रवाह जसा अनेक वळणे घेऊन समुद्राला मिळतो, तसा वारकर्यांच्या भक्तीच्या प्रेमाने भारलेला प्रवाह पंढरपूरला येऊन मिळतो.
इ. फेरा किंवा खेप : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत ‘वारी’ हा शब्द ‘फेरा’ किंवा ‘खेप’ या अर्थाने वापरला आहे.
१ ई. पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी. श्री शिवलीलामृत ग्रंथात श्रीधरस्वामी म्हणतात,
‘ज्यासी न घडे सत्समागम । त्याने करू जावे तीर्थाटन ॥’ – श्रीधरस्वामी
अर्थ : प्रतिदिनच्या रहाटगाडग्यात ज्याला सत्समागम होत नाही, त्याने तीर्थाटन करावे.
हे करतांना आपोआपच संतदर्शन होते. पंढरपूरच्या वारीत या दोन्ही गोष्टी होतात. सर्व जातीभेद विसरून ‘वासुदेवः सर्वम् ।’ म्हणजे ‘सर्वकाही वासुदेवच आहे’, याचा बोध घेत जनसामान्यही भक्तीचा रस चाखू शकतात. केवळ पायी चालणे म्हणजे वारी नसून पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी.
२. पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व !
विठुरायाच्या नामगजरात निघणार्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो, त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूलदेहही चंदनाप्रमाणे झिजतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात. – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०१६)
भगवान श्रीविष्णूचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती होय. ती केवळ साधी मूर्ती नाही, तर श्रीविष्णूचा सगुण देह आहे. पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात. कोणाचेही निमंत्रण नसतांना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने न्हाऊन निघतात. थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो, तेव्हा काही काळासाठी त्या जिवाची उन्मनी अवस्था झालेली असते. पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे. – श्री. श्रीकांत भट, अकोला.
२ अ. पाच वेळा काशीला आणि तीन वेळा द्वारकेला जाऊन जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते !
पृथ्वीवरी तीर्थे असती अपार । परी पंढरीची सर । एकाही नाही ॥ असा दाखला संत नामदेव महाराज देतात, तर न करी आळस । जाय पंढरीशी । अवघी सुखराशी । तेथे आहे ॥, असे संत चोखामेळा यांनी म्हटले आहे. काशीच्या पाच यात्रा, द्वारकेला तीन वेळा जाणे, या दोन्ही यात्रांनी जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते. सर्व सुखाचे आगर आणि संत मंडळींचे माहेरघर असल्यानेच अवघी दुमदुमली पंढरी । भगव्या पताका खांद्यावरी । तुळशी वृंदावन डोक्यावरी । भाव भुकेल्यांची ही वारी ।, असे म्हटले जाते.
२ आ. वारकर्यांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते !
संत ज्ञानेश्वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला. तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृतावस्थेत आली आहे. वारकरी राम कृष्ण हरी । असे नामसंकीर्तन सतत करत पंढरीस जातात. कलियुगात ईश्वराची कृपा संपादन करणार्या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात, तेव्हा ती समष्टी साधना होते. वारीमध्ये व्यष्टीसह समष्टी साधनाही होते आणि सर्व जिवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते. या तीर्थाचा महिमाच असा आहे. येथील भक्तांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेेच लागते. पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड झरा पाझरू लागतो. भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत अशीच चालू रहाणार आहे.
२ इ. देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती पंढरपूरला येते !
भक्तांच्या संकटसमयी धावून येण्यासाठी, आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे. देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती घ्यायची असल्यास पंढरपूरला जावे.
३. शिस्तबद्धतेचे दर्शन
शिस्तीचे दर्शन हे पालख्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रत्येक दिंडीची रचना ठरलेली आहे. प्रारंभी भगवे ध्वजधारी वारकरी, मग तुळशी-वृंदावन घेतलेल्या महिला, त्यामागे टाळकरी, नंतर विणेकरी अशीच सर्व दिंड्यांची रचना असते. टाळ वाजवणार्या वारकर्यांचा पदन्यासही लयबद्ध असतो. भले टाळकरी-वारकरी शेकडोंच्या संख्येने का असेना !
४. भावभक्तीची अनुभूती देणारा पालखी सोहळा !
वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी ! श्रीक्षेत्र आळंदी आणि देहू येथून निघणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव ! ऊन-पावसाची तमा न बाळगता भगवी पताका खांद्यावर घेऊन टाळ-मृदुंगाचा गजर करत चालणारे वारकरी म्हणजे भावभक्तीचेच प्रतीक ! कोणाच्याही तोंडवळ्यावर चिंता नाही कि मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधांची अपेक्षा नाही. वारकर्यांना प्रतिदिन १० ते २० किलोमीटरचा टप्पा चालत पार करावा लागतो. सकाळी लवकर मार्गस्थ व्हावे लागते. अल्पाहार आणि महाप्रसादही वाटेतच घ्यावा लागतो. सायंकाळी विलंबाने मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर भजन-कीर्तन होऊन दिवसाची समाप्ती होते.
श्री विठ्ठल आणि पंढरपूरची वारी यांचे छायाचित्रांच्या माध्यमातून भावपूर्ण दर्शन घेऊया !
विठुमाऊली तू माऊली जगाची । माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ॥ असा वारकऱ्यांचा पंढरीच्या विठुरायाप्रती असलेला भाव जगात सुविख्यात आहे. विठ्ठल विठ्ठल, जय हरि विठ्ठल, असे विठ्ठलाला आळवत वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना करतात.
पांडुरंग आणि पंढरपूर विषयी अधिक लेख वाचा !
पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !
पांडुरंग आणि एकादशी यांचे माहात्म्य !
आषाढी एकादशी – पंढरपूरला होणारा भागवतभक्तांचा महासंगम
श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी !
डोळे भरून पहावा, असा पंढरपुरातील परंपरागत श्री पांडुरंग रथोत्सव सोहळा !
वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत
विठ्ठल संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ग्रंथ खरेदी करा !
पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)
> भिमा नदीला चंद्रभागा; म्हणून का संबोधतात ?
> विठ्ठलाच्या मूर्तीचे महात्म्य काय आहे ?
> पांडुरंग विटेवर उभा आहे, याचा भावार्थ काय ?
> विठ्ठलाच्या पायाखाली असलेल्या विटेचे रहस्य काय ?
> आद्यशंकराचार्यांनी पंढरपूरला ‘महायोग पीठ’ का संबोधले आहे ?
पांडुरंगाला संतांनी ‘कानडा’; म्हणून हाक का मारली आहे ?
श्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)
> विठ्ठलपूजेत तुळस आणि गोपीचंदन यांचे महत्त्व काय ?
> विठ्ठलोपासनेत टाळ-मृदुंग वाजवण्याचे कारण काय ?
> विठ्ठलमूर्तीची ‘सूक्ष्मातील वैशिष्ट्ये’ कोणती ?
> आषाढी एकादशी आणि वारकरी यांची ‘सूक्ष्म-चित्रे’
विठ्ठलभक्तांनो, धर्मरक्षण करणे, हे धर्मपालनच आहे !
अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्याने हा विषय आपण बुद्धीने समजून घेण्यासमवेतच श्रद्धेने आणि भाव ठेवून समजून घेण्यासाठी सनातन संस्थेच्या ऑनलाइन साप्ताहिक सत्संगात सहभागी व्हा !
खूप सुंदर माहिती.प्रत्यकाने संग्रही ठेवावी.