‘ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. आपण कितीही शिकलो, तरी ते अल्पच असते. आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे ‘मी’पणा अल्प होणे आणि ज्ञानातील चैतन्य अनुभवता येणे, असे दोन लाभ होतात. या दोन्ही लाभांमुळे आनंद अनुभवता येतो. याउलट शिकवण्यामध्ये ‘मला येते’, हा अहं वाढत जातो आणि ज्ञानातील चैतन्य अनुभवता येत नाही. त्यामुळे शिकवण्याच्या भूमिकेत रहाण्यात हानी अधिक आहे.’
– (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. आठवले