‘मोतीबिंदू झालेल्याला बारीक अक्षर दिसत नाही. कुणी ते बारीक अक्षर वाचून दाखवले, तर मोतीबिंदू झालेला त्याला ‘तेथे अक्षर आहे’, असे तुम्ही खोटेच भासवता आहात’, असे म्हणत नाही. तो म्हणतो, ‘मला बारीक अक्षरे दिसत नाहीत.’ त्याने चष्मा लावल्यावर त्याला बारीक अक्षर वाचता येते.
याउलट बुद्धीप्रामाण्यवादी त्यांना मान्य नसणारे ‘सर्व खोटे आहे’, असे म्हणतात. ‘साधनेने सूक्ष्म दृष्टी प्राप्त झाल्यावर बरेच कळते’, हे त्यांना मान्य नसते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले