‘देव इथेच भेटणार. तिथे नाही भेटणार. हे केले, तर देव भेटणार. हे केले नाही, तर भेटणार नाही’, असे काही नाही. देवाला कोणतीच चौकट नाही. आपण ‘देव हवा’; म्हणून साधना करतो; पण एक चौकट घालून तेथे देवाला शोधतो आणि ‘तो सापडत नाही’, असे म्हणतो. देव कोणत्याही चौकटीत नाही. ज्या परिस्थितीत देवाने ठेवले, त्यात देवाला शोधले की, आपल्याला आनंद होतो. परिस्थितीत देव असतोच, उदा. आपण काही करू शकत नाही, तर त्या वेळी अनुसंधान तरी ठेवू शकतो ना ? तिथे देव आहेच ना ? ज्या स्थितीत देवाने ठेवले आहे, तेथे देव भेटतोच. मग काळजी कशाला करायची ? तो सर्वत्र आहे, तर त्याला अनुभवायचा प्रयत्न करूया आणि त्याच्या अनुसंधानातील आनंद घेऊया.’
– पू. (सौ.) संगीता जाधव