‘पोलिसांचा प्रतिदिन गुन्ह्यांशी संबंधित अनेक संशयितांशी संपर्क येतो. या संशयितांकडून गुन्ह्याच्या संदर्भातील आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी प्रसंगी कठोर होऊन त्यांना मानसिक आणि शारीरिक दंडही द्यावा लागतो. हा त्यांच्या कार्यशैलीचा एक भाग असतो. चौकशीअंती एखादी संशयित व्यक्ती निर्दाेष असल्याचेही लक्षात येते; पण कर्मफलन्यायानुसार पोलिसांना त्या निर्दाेष व्यक्तीला दिलेल्या दंडाचे पाप लागते अन् त्या व्यक्तीबरोबर केलेल्या गैरवर्तणुकीमुळे त्या व्यक्तीबरोबर देवाण-घेवाण हिशोबही निर्माण होतो. पोलिसांनी आयुष्यातील बहुतांश काळ हेच केल्यामुळे त्यांचे अनेकांबरोबर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतात आणि पापही वाढत जाते. यासाठी पोलिसांनो, हे टाळण्यासाठी प्रतिदिन कठोर साधना करा ! साधना केल्यास निर्दाेष कोण आणि गुन्हेगार कोण, हे सूक्ष्मातूनच कळू लागेल. त्यामुळे निर्दाेषांना त्रास दिल्याचे पापही लागणार नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले