‘एखाद्या संस्थेचा अध्यक्ष, पदाधिकारी असणे किंवा वृत्तपत्राचा संपादक असणे, हे खूप मानाचे समजले जाते. या दोन्ही पदांचा विचार केला, तर समाजामध्ये आजवर अनेक संस्थांचे नामवंत पदाधिकारी, तसेच नामवंत संपादक होऊन गेले आहेत. अनेक पदाधिकार्यांनी त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्ये केली आहेत, तसेच अनेक संपादकांनी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे कार्य केले आहे. असे असले, तरी काही काळानंतर लोकांना त्यांच्या कार्याचा, प्रबोधनाचा विसर पडला. याउलट गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, एकनाथी भागवत यांसारखे ग्रंथ अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. काही शतकांनंतर आजही त्यांचा अभ्यास केला जातो. याचा अर्थ अध्यात्माशी संबंधित, म्हणजे सत्य सांगणारे कार्य, लिखाण हे चिरंतन टिकणारे असते. यासाठी मीही ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’ चा अध्यक्ष होतो आणि ‘सनातन प्रभात’ या नियतकालिक समुहाचा संस्थापक-संपादकही होतो. पदाधिकारी, संपादक यांसारख्या पदांचा त्याग करून केवळ चिरंतन टिकणार्या अध्यात्मावरील ग्रंथांचे लिखाण करण्यास प्रारंभ केला.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.२.२०२२)