पूर्वीच्या काळी हिंदू धर्माचरणी आणि धर्माभिमानी होते. त्यामुळे त्यांना ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ (मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५) म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.’, हे लागू होत होते. सध्याच्या काळात हिंदू धर्माचरण करत नाहीत आणि त्यांच्यामध्ये धर्माभिमानही नाही. त्यामुळे ‘येणार्या आपत्काळात तुमचे रक्षण होण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी साधना करा’, असे त्यांना सांगावे लागत आहे.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१२.२०२१)