म्हातारपण हा एकप्रकारे देवाचा आशीर्वादच असतो !

‘मनुष्य जन्माला आल्यापासून वयस्कर होईपर्यंत तो स्वकर्तृत्त्वाचा अभिमान, आप्तस्वकीय, विविध विषयांची आसक्ती अशा अनेक सांसारिक गोष्टींमध्ये मनाने पूर्णतः गुंतून जातो. या स्थितीत त्याला ‘मृत्यू नको’, असे वाटते. त्यानंतर म्हातारपणी विविध आजारपणांमुळे दुःख भोगायला लागते. त्यामुळे त्याला ‘मृत्यू लवकर यावा’, असे वाटते. त्यामुळे म्हातारपण हा एकप्रकारे मायेतून मुक्त करण्यासाठीचा देवाने दिलेला आशीर्वादच आहे, ज्यामुळे मनुष्य स्वतः देह सोडून जायला तयार होतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)

Leave a Comment