‘प्रत्येक मनुष्य प्रारब्ध भोगण्यासाठी जन्माला येत असतो. हे प्रारब्ध भोगण्यासाठीचे बळ केवळ कुलदेवतेचे दर्शन, तिचा नामजप करणे, कुलाचारांचे पालन यांसारख्या उपासनेमधून मिळत असते. यासाठी साधनेचा प्रारंभ कुलदेवतेच्या उपासनेपासूनच करावा. हा साधनेचा प्राथमिक नियम आहे, जो सर्वांसाठी सारखाच लागू पडतो. कुलदेवता ज्ञात नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’, असा तिचा नामजप करावा.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.२.२०२२)