‘ज्ञानयोगामध्ये ‘का ? कशासाठी ?’ या प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी बुद्धी सतत कार्यरत असते. त्यामुळे बुद्धीलय होण्यास अधिक वेळ लागतो. अन्य साधनामार्गांमध्ये ‘सांगितलेले केवळ कृतीत आणणे’, इतकेच असते. त्यात प्रारंभापासूनच बुद्धी कार्यरत नसते. त्यामुळे बुद्धीलय लवकर होतो. यामुळेच ज्ञानयोगाच्या तुलनेत अन्य साधनामार्गांमध्ये आध्यात्मिक प्रगती जलद होते.’
– परात्पर गुरु डॉ. आठवले (४.१.२०२२)