‘साधनेसाठीच्या अनुकूल परिस्थितीत साधनेचे प्रयत्न चांगले होतात. साधनेसाठीच्या प्रतिकूल परिस्थितीत मात्र साधनेचे प्रयत्न चांगले होणे, हे साधनेच्या प्रयत्नांच्या ताकदीवर अवलंबून असते. ही ताकद प्रयत्नांची तळमळ आणि प्रयत्नांमधील नियमितता यांवर अवलंबून असते. ‘आगामी आपत्काळात कोणकोणत्या भीषण परिस्थितींचा आपल्याला सामना करावा लागेल’, याचा आपण आता अंदाजही करू शकत नाही. यासाठी आताच साधनेच्या प्रयत्नांची ताकद वाढवली, तरच आपण त्या आपत्काळात तरून जाऊ शकतो; अन्यथा नाही !’
– (पू.) संदीप आळशी (२८.३.२०२१)