‘अनेक जण संतांचे चरित्र वाचतात, तर काही जण त्याची पारायणेही करतात. यात लक्षात घेतले पाहिजे की, संतांचे चरित्र वाचले, तर त्यातून ‘केवळ त्यांनी साधना कशी केली’, हे समजते. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी चमत्कार केल्याचा उल्लेख असेल, तर त्यातून आपल्या मनात केवळ त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होतो. त्यांची शिकवण अभ्यासली, तरच आपली साधनाही त्यांच्यासारखी होऊ शकते आणि आपल्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे केवळ संतचरित्र वाचण्यापेक्षा त्यांची शिकवण आत्मसात करावी !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.१२.२०२१)