साधनेतील प्राथमिक टप्प्यात स्त्रियांची प्रगती लवकर होते; परंतु ठराविक टप्प्यानंतर त्या मायेत अडकत असल्याने पुरुष संतांची संख्या अधिक असते !

स्त्रियांमध्ये भाव असल्याने साधनेतील प्राथमिक टप्प्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची प्रगती लवकर होते. नंतर पुरुष लवकर संत होतांना दिसून येतात; कारण स्त्रियांपेक्षा पुरुष मायेत अल्प प्रमाणात अडकलेले असतात. स्त्रीला तिचा नवरा, मुले-बाळे, नातवंडे या सर्वांविषयीचे विचार मायेत अडकवतात. त्यामुळे तिचा अध्यात्मात पुढे जाण्याचा वेग काही ठराविक टप्प्यानंतर मंदावतो; म्हणून अध्यात्मात स्त्रिया संत होण्याची संख्या त्यामानाने अल्प असते. स्त्रीवर घर सोडून पुरुष साधनेसाठी बाहेर पडू शकतो; परंतु स्त्रीला असे करणे थोडे कठीण जाते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment