‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही, उदा. एखाद्या बसला अपघात घडून त्यामध्ये २० प्रवासी मेले आणि १ प्रवासी वाचला. या घटनेमध्ये विज्ञानाच्या दृष्टीकोनातून अपघात होण्याची कारणे ‘रस्ता खराब असणे, बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे, चालकाची चूक असणे’ यांसारखी मर्यादित असतील; पण ‘त्याच २० जणांचा एकत्रित मृत्यू का झाला आणि एकच का वाचला ?’, याचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही. ‘त्या २० जणांचा मृत्यूयोग होता; म्हणून बस अपघाताच्या माध्यमातून त्यांचा एकत्रित मृत्यू झाला आणि वाचलेल्या एकाचा मृत्यूयोग नव्हता, तर ‘केवळ अपघातामध्ये सहभागी होणे, इतकेच त्याचे प्रारब्ध होते’, हे त्याचे कारण होते’, असा विचारही विज्ञान करू शकत नाही. त्यामुळे विज्ञानाला ते शोधणेही दूरच आहे. यावरून ‘विज्ञान अद्याप किती बाल्यावस्थेत आहे’, याची कल्पना येते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले