‘अनुकूल काळात नव्हे, तर प्रतिकूल काळातच साधकाच्या साधनेची खरी परीक्षा होते. आपत्कालीन स्थितीत आत्मपरीक्षण करण्याची नामी संधी असते. ‘अशा काळात आपली मनःस्थिती कशी आहे ? प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची मनाची कितपत सिद्धता आहे ?’, याचे चिंतन करता येते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली अमूल्य शिकवण आपल्या अंतर्मनात खरोखरंच रुजली आहे का ?’, याचे मूल्यमापन करणेही सोयीचे जाते. त्यामुळे साधकांनी आत्मचिंतन करून साधना वाढवून भीषण आपत्काळासाठी सिद्ध व्हावे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.