पश्चिमेतील कुणी विद्वान योगसाधनेची प्रशंसा करतो, तेव्हा आम्हाला त्याचे महत्त्व लक्षात येते आणि आम्ही त्याला योगसाधनेच्या नाही, तर योगाच्या रूपात स्वीकारतो. तेसुद्धा त्याच्या मूळ रूपात नाही, तर योगाच्या ८ अंगांपैकी केवळ ३ अंगे म्हणजेच आसन, प्राणायाम आणि ध्यान इथपर्यंतच सीमित रहातो. आज योग हळूहळू शरीर आणि प्राण यांचाच व्यायाम होत चालला आहे. आजचे योगगुरुही यम, नियम, प्रत्याहार, धारणा, समाधी आदींची चर्चा करतांना आढळून येत नाहीत.
– श्री. ईश्वर दयाळ, (साभार : मासिक ‘संस्कारम्’, जून २०१७)