कला-उपासक आणि कलाकार यांच्यातील भेद

१. कला-उपासक : जो निरपेक्ष भावाने आणि त्यागी वृत्तीने ‘ईश्‍वरप्राप्ती’ हा उद्देश ठेवून कलेची साधना करतो, तो ‘कला – उपासक’ होय. कला-उपासक म्हणजे ‘कला हेच ज्याचे उपास्य दैवत आहे असा तो.’

१ अ. कला-उपासक म्हणजे कलेची उपासना करणारा, म्हणजे कलेलाच देव समजून समर्पित भावाने त्याच्या कलेचे सादरीकरण करणारा : ‘कलाकार’ या शब्दाच्या तुलनेत ‘कला-उपासक’ या शब्दाचा उच्चार करतांना आनंद वाटतो आणि चांगले जाणवते. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या अध्यात्मशास्त्राच्या सिद्धांतानुसार जसा शब्द, तशी त्यातून निर्माण होणारी शक्ती वेगवेगळी असते. कला-उपासक हा कलेलाच देव समजून आणि तिच्याप्रती समर्पित भाव ठेवून आपल्या कलेचे लोकांसमोर सादरीकरण करतो. यालाच ‘कला-उपासना’ करणे, असे म्हणतात. आजकाल असे कला-उपासक दुर्मिळ झाले आहेत.

२. कलाकार : हा लोकेषणेसाठी केवळ व्यावहारिक दृष्टी ठेवून कला शिकतो आणि ती लोकांसमोर सादर करतो. तो निवळ बाह्यांगी ‘कलाकार’ असल्याने त्याला ‘उपासक’ ही उपमा देणे योग्य नाही.

– श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment