१. संगीतकला : संगीतकलेमध्ये देहाची आतून साधना होते. संगीत साधनेत साधकाचा देहच माध्यम असल्याने निर्माण होणारे चैतन्य थेट देहावर अंतर्बाह्य परिणाम करते.
२. वाद्यकला : वाद्यकलेमध्ये देहाची बाहेरून साधना होते. बाह्यवस्तूचा आधार घेऊन चैतन्य निर्माण करावे लागते. वाद्यकलेच्या माध्यमातून देवापर्यंत जाणे संगीत साधनेच्या तुलनेत कठीण असते; परंतु देवाप्रती भाव असेल, तर अशक्य असे काहीच नसते. कलाकारात भाव असेल, तरच वाद्य ‘देवता’ बनून कलाकाराची अंतर्बाह्य शुद्धी घडवून आणते.
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ