साधनेत आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होण्यासाठी ‘सेवा परिपूर्ण करणे’ अतिशय महत्त्वाचे आहे !

रामनाथी आश्रमात नामजपादी उपाय करण्यासाठी, तसेच एका हवन विधीची सिद्धता म्हणून एका पुरोहितांनी सांगितलेले महत्त्वाचे पूजा साहित्य एका साधकाने खोक्यातून चेन्नईहून रामनाथी आश्रमात पाठवले होते. हे साहित्य पाठवल्यावर त्याचा योग्य तो पाठपुरावा संबंधित साधकाकडून घेतला गेला नाही. तेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘साधनेत परिपूर्ण सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे. आपण जी सेवा करतो, त्या सेवेचे १०० टक्के दायित्व आपणच घेतले पाहिजे. अध्यात्मात गुरुकार्याच्या ध्यासाने आणि परिपूर्ण सेवेनेच खरी प्रगती होते.”

साहित्य पाठवल्यावर ‘ते साहित्य व्यवस्थित बांधून बसमध्ये नीट ठेवले आहे का ? गोव्याला बस आणि पार्सल वेळेत पोचले का ? आश्रमात साहित्य पोचल्यावर ते चांगल्या स्थितीत होते ना ? साहित्य मिळाल्याची पोच मिळाली का ? संबंधित साधकाच्या हातात साहित्य दिले का ? ज्या कारणासाठी ते पाठवले होते, तसा त्याचा उपयोग करता आला का ? साहित्याविषयी काही अडचणी तर आल्या नाहीत ना ? हे साहित्य पाठवण्याच्या सेवेत काही चुका झाल्या नाहीत ना ?’, हे सर्व संबंधित साधकाने पहाणे तितकेच आवश्यक आहे.

गुरुसेवा पूर्ण होण्यासाठी आपण सेवेचे दायित्व घेऊन त्यासाठी १०० टक्के झटले पाहिजे. हे झटणे, म्हणजेच सेवेचा ध्यास आहे. हा ध्यास माणसाला ध्येयप्राप्ती करून देईपर्यंत स्वस्थ बसू देत नाही. तसे आपले झाले पाहिजे.

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२०)

Leave a Comment