दुःख कुणीही पचवू शकणे; मात्र कौतुक पचवता न येणे आणि ते केवळ गुरुकृपेनेच शक्य होणे !​

कष्ट सहन करून दु:खाला सामोरे जाता येऊ शकते; पण जेव्हा आपले कौतुक होते, तेव्हा मात्र जिवाचे कर्तेपण वाढून ‘अहं’ जोपासला जाऊ शकतो. हा ‘अहं’ आपल्याला पुन्हा अधोगतीकडे नेण्यास कारण ठरतो. श्री गुरु साधकाला याची वेळोवेळी जाणीवही करून देतात आणि साधकाला ‘अहं’चा बळी होण्यापासून वाचवतात. दुःख असो वा कौतुक या दोन्ही गोष्टी मायेतील मृगजळासमानच आहेत. श्री गुरूंच्या मार्गदर्शनामुळे ‘हे कौतुक माझे नसून माझ्याकडून योग्य कर्म करवून घेणार्‍या माझ्या श्री गुरूंचे आहे’, याची जाणीव झाल्यावर कौतुकाचेही काही वाटत नाही. उलट श्री गुरूंप्रती कृतज्ञताभाव जागृत होतो. कौतुकाचे शब्द श्री गुरूंच्या चरणांशीच अर्पण केल्याने जीव कौतुकापासून बाजूला होऊ शकतो. ‘सर्वकाही देवाचे आहे. त्याचे त्यालाच अर्पण’, हा भाव मनात निर्माण झाल्याने तो जीव खर्‍या अर्थाने आसक्तीविरहीत होतो आणि कौतुकातील ईश्‍वरी तत्त्वाची अनुभूती घेण्यास पात्र ठरतो.

– श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment