‘सतत इतरांकडून शिकणे, म्हणजे अखंड ‘शिष्यभावात’ रहाणे. यामुळे चराचरात प्रत्येक ठिकाणी गुरुतत्त्वाला पहाणे शक्य होते. शिष्यभाव साधकाला श्री गुरूंच्या देहापलीकडे असलेल्या चैतन्याची जाणीव करून देतो. प्रत्येकालाच ‘गुरु’ या भावाने पाहिल्याने साधकाला कुणाविषयी प्रतिक्रिया येत नाहीत. त्यामुळे त्याच्या अपेक्षा संपतात आणि आपोआपच त्याचे मायेत अडकणेही संपते. मायाच संपुष्टात आल्याने साधकाला चिरंतन अशा शाश्वत आनंदाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होते. यालाच ‘गुरुकृपा होणे’, असे म्हणतात.
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ