बोलतांना वाणीही शिष्यभावात म्हणजे नम्र असण्याचे महत्त्व !

१. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असल्यामुळे बोलतांना अतिशय सांभाळून बोलावे ! :
‘आपल्या प्रत्येक कृतीत शिष्यभाव असायला हवा. इतरांशी बोलतांना आपली वाणीही शिष्यभावात असायला हवी, म्हणजेच नम्र असायला हवी. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते. त्यामुळे बोलतांना अतिशय सांभाळून बोलावे. कुणालाही वावगे बोलू नये. तोंडातून अपशब्द काढू नयेत.

२. शब्द म्हणजे ‘नादशक्ती’ असल्यामुळे आणि ‘नाद’ हा आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने बोलण्याचा परिणाम स्वतःसमवेतच सभोवतालच्या वातावरणावरही होत असणे; म्हणून बोलतांना विचार करून बोलावे ! :
वाणीमध्ये ‘नादशक्ती’ असल्याने आणि ‘नाद’ हा आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने आपल्या बोलण्याचा सूक्ष्म परिणाम हा जसा आपल्यावर होत असतो, तसा सभोवतालच्या वातावरणावरही होत असतो. एकदा बोललेला शब्द पुन्हा मागे घेता येत नाही; त्यामुळे बोलतांना विचार करून सुबुद्धीचा वापर करून मगच बोलावे.

-श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment