ईश्वराचे सगुण रूप असलेल्या संतांमध्ये देवच असल्याने ते इतरांसाठी आधारस्तंभ बनणे, आपणही त्यांच्यासारखे साधनेने सक्षम बनून इतरांंचा आधार बनणे आवश्यक !
‘स्वतःला एवढे सक्षम करा की, तुमचा इतरांना आधार वाटायला हवा. एवढे छान प्रयत्न (साधना) करा की, तुम्ही दुसर्यांचा आधार बना; कारण तुमच्या साधनेमुळे इतरांना तुमच्यात असणार्या ईश्वरी तत्त्वाचाच आधार वाटू लागतो. मानव मानवाला आधार देऊ शकत नाही. साधक साधकाला आधार देऊ शकत नाही; परंतु संत मात्र इतरांना आधार देतात; कारण ते ईश्वराचेच एक सगुण रूप आहेत. संतांमधील देवच इतरांचा आधारस्तंभ बनतो.’
-श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ