तळमळीने साधना करून भगवंताची लीला अनुभवण्यातच खरा आनंद असणे

‘आपण कधीही काही कमवत नाही आणि गमावतही नाही; कारण प्रत्येक कर्म करणारा कर्ता-करविता तर ईश्‍वरच आहे. मग कसले दुःख आहे ? त्या जगाच्या पालनकर्त्यावर सर्व सोडून द्या आणि निर्धास्त मनाने साधना करा आणि पहा तर खरं, तो आपल्यासाठी काय काय करतो ते ! भगवंताची लीला अनुभवण्यातच खरा आनंद आहे. तळमळीने साधना करण्याचे दायित्व केवळ आपले आहे. त्यानंतर तोच तुम्हाला फुलासारखा जपतो. तुम्ही सर्वस्वी त्याचे झालात की, तो कायमचाच तुमचा होतो.’

-श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment