उच्च विचारांमध्ये कमालीची सकारात्मक ऊर्जा साठवलेली असते

उच्च विचारांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे आणि त्यांमुळे दैवी कार्य घडत असल्याने मनाला त्यांचे खाद्य देऊन ते निरोगी ठेवावे !

‘आयुष्यात कधीही स्वतःला न्यून लेखू नका. कनिष्ठ विचार करू नका. नकारात्मकतेत जाऊ नका. त्याऐवजी उच्च आणि व्यापक विचारांनी मोठे व्हा. उच्च विचारांमध्ये कमालीची सकारात्मक ऊर्जा साठवलेली असते. ही ऊर्जा तुमच्या मनाला चांगले कार्य करण्यासाठी प्रभावित करणारी असते. केवळ चांगल्या विचारांनीसुद्धा हातून दैवी कार्य घडते. अन्नापेक्षा शरिरावर पडणारा विचारांचा प्रभाव अधिक सूक्ष्म असतो. ज्यांचे मन चांगले असते, त्यांचे आरोग्यही आपोआपच चांगले रहाते; म्हणूनच शरिराबरोबरच मनालाही चांगल्या दैवी विचारांचे खाद्य द्या आणि निरोगी रहा.’

– श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment