‘मी काहीही खाल्ले, तरी त्याचे रक्त बनते, ही किमया कोण करू शकतो ? माझा प्रत्येक श्वास कुणामुळे अखंड चालू आहे ? मोठ्या अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून माझे प्रत्येक क्षणाला कोण रक्षण करतो ?’, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधल्यास भगवंताची लीला अनुभवता येऊ शकते. यांसाठी दिवसातून मी किती वेळा कृतज्ञता व्यक्त करतो ?’, याचाही विचार करावा.’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)