‘राष्ट्रभक्त आणि क्रांतीकारक राष्ट्रातच देवाला पहातात; म्हणून ते राष्ट्रावर निरपेक्ष प्रेम करतात अन् राष्ट्रासाठी प्राणांचेही बलीदान करतात. विविध संप्रदाय आणि साधनामार्ग यांनुसार साधना करणार्या बहुतांशी साधकांनी गतजन्मांमध्ये व्यष्टी साधना केलेली असल्याने ते वर्तमान जन्मातही गुरु किंवा देव यांच्यावर निरपेक्ष प्रेम करू शकतात आणि व्यष्टी साधनेसाठी जीवन समर्पित करू शकतात. आता काळानुसार समष्टी साधना, म्हणजे हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कार्य करणे अपरिहार्य बनले आहे. साधकांनी, तसेच धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी हिंदु राष्ट्रातच गुरु किंवा देव यांना पहायचा प्रयत्न केला, म्हणजे ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य, ही गुरुसेवा असून ते ईश्वरप्राप्तीचे साधन आहे’, असा भाव ठेवला, तर त्यांना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याविषयी प्रेम वाटून त्यासाठी जीवन समर्पित करण्याची त्यांची सिद्धता होईल.’
– (पू.) श्री. संदीप आळशी (१९.२.२०२०)