‘परमात्म्याची कृपा श्रेष्ठ असून संसार मिथ्या आहे, हे कुणालाच आपोआप उमजत नाही. नुसत्या गप्पा येतील; पण आचरण मात्र त्यानुरूप होत नाही. जन्माला आलेल्यास मरण चुकत नाही, लक्ष्मी चंचल आहे, इंद्रियवशतेमुळे नाश ओढवतो’, या सगळ्या गोष्टी ठाऊक नाहीत, असा कुणीही नाही; पण मनातले विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे किती निघतील ? मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत असते, नुसती बडबड काही उपयोगाची नाही. दिलदारपणाच त्याला मोठेपणा मिळवून देतो. परहितासाठी झटणाराच खर्या अर्थाने मनुष्य होय.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक, ‘श्रीधर संदेश’, मे १९९५)