‘या नश्वर देहास बाहेरून सजवण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणी, साबण यांनी स्वच्छ करून आणि सुवासिक करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या देहातील आत्म्यास त्याचा काहीही उपयोग नसतो. त्याला सुगंध किंवा दुर्गंध याचेही काही वाटत नसते. जसे ताप आलेल्या मनुष्याने कुपथ्य केल्यास ताप वाढतो, तसा शृंगार हा विषयवासनायुक्त मनुष्यास अधोगतीस नेण्यास पात्र होतोे. क्षयी मनुष्यास शृंगार चढवल्यास त्याची व्यथा अल्प होईल का ? त्यासाठी औषध आणि पथ्य याचीच आवश्कता असते.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’ जानेवारी १९९८)