‘या सुकणार्या, नश्वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ? भ्रमात राहू नकोस, आपल्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन हो, खरोखरंच दुसरे काहीही नाही. जन्म-मरणाची वार्ता हे शेवटचे भाष्य आहे.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक, ‘श्रीधर संदेश’, जानेवारी १९९९)