विजयादशमीपासून हिंदु समाज आणि देशहित यांच्या रक्षणासाठी सीमोल्लंघन करा !
‘वर्ष २०२१ ते २०२३ हा जागतिक महायुद्धाचा काळ असणार आहे. या काळात भारतीय सैन्यालाही सीमोल्लंघन करावे लागणार आहे. भारतीय सीमेवर युद्ध चालू झाल्यानंतर शत्रूराष्ट्रांचे हस्तक असणारे देशांतर्गत शत्रू अराजकता निर्माण करण्यासाठी गृहयुद्ध भडकवू शकतात. तसेच देशाच्या दृष्टीने प्रतिकूल असलेल्या या काळात पूर, भूकंप, युद्ध इत्यादींमुळे गावेच्या गावे उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत स्वतःचे, कुटुंबियांचे आणि ज्या समाजात आपण रहातो, त्या हिंदु समाजाचे रक्षण करण्याच्या हेतूने पोलीस अन् सैन्य यांच्या साहाय्यासाठी घराबाहेर पडावे लागेल. वर्षानुवर्षे ‘मी भले आणि माझे भले’ या मानसिकतेत अडकलेल्या हिंदु समाजासाठी हे एक प्रकारचे सीमोल्लंघन असेल.
हिंदूंनो, प्रतिवर्षी केवळ कर्मकांड म्हणून शस्त्रपूजन, अपराजितापूजन आणि सीमोल्लंघन करण्यापेक्षा या विजयादशमीपासून हिंदु समाजाचे रक्षण, तसेच देशहित यांसाठी खरेे सीमोल्लंघन करण्याचा निश्चय करा !’