‘माझ्याकडे कुणी लक्ष देत नाही’, असा विचार करायला नको. आपण जे काही करतो, त्या प्रत्येक गोष्टीची नोंद देवाकडे होत असते. आपल्याला असे वाटणे; म्हणजे आपल्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. आपल्या संदर्भात जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते. देव कधीच चुकीचे करणार नाही. ‘देव आणि मी’, याकडेच आपण लक्ष द्यायचे. ‘कोण कसे वागते ?’, याकडे लक्ष न देता आपण आपली सत्सेवा आणि साधना करत रहायचे. मनाला वाटणारी असुरक्षितता अल्प होण्यासाठी त्याला स्वयंसूचनेचे खाद्य द्यायला हवे. मनाला सतत देवाला धरून रहायला शिकवायला हवे. देवाला धरून राहिलो, तर त्यातून आपली साधना होते.’