साधनेच्या मार्गानुसार देवघरातील देवांची संख्या पालटते.
१. व्यष्टी साधना : व्यष्टी साधना करणार्यांना अनेकातून एकात जायचे असते. त्यामुळे त्यांनी देवघरातील देवांची संख्या अल्प करत एकाच देवाच्या मूर्तीची किंवा छायाचित्राची पूजा करावी. कुटुंबातील इतर भक्तीमार्गी असल्यास देवघरात इतर देवांच्या मूर्ती किंवा चित्रे असतात; पण आपण मनातून एकाच देवतेकडे लक्ष द्यावे.
२. समष्टी साधना : समष्टी साधना करणार्यांनी त्यांच्या साधनेनुसार त्या त्या देवतेचे तत्त्व आपल्याला मिळावे, यासाठी त्या त्या देवतेची मूर्ती किंवा चित्र देवघरात ठेवावे, उदा. लिखाण करणार्यांनी श्रीगणेशाची, स्वसंरक्षण प्रशिक्षण करणार्यांनी श्रीकृष्ण, श्रीराम, हनुमान अशांपैकी श्रद्धा असलेल्या एका देवतेची, धन अर्पण मिळवण्याची सेवा करणार्यांनी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. याच जोडीला व्यष्टी साधनेसाठी आवश्यक त्या देवतेची मूर्ती किंवा चित्र ठेवावे; कारण समष्टी साधना नीट होण्यासाठी व्यष्टी साधनेचा पाया नेहमीच भक्कम असावा लागतो.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले