पूर्ण वेळ साधक होता येत नाही; म्हणून खंत करणार्‍यांनो, घरी राहूनही साधना करता येते, हे लक्षात घ्या !

काही जणांना पूर्ण वेळ साधना करण्याची तीव्र इच्छा असते; पण घरी आई-वडिलांना पहाणारे कोणी नसते किंवा आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यामुळे ते पूर्ण वेळ साधक होऊ शकत नाहीत. अशांनी पूर्ण वेळ साधना करता येत नाही, अशी खंत करण्यापेक्षा आई-वडिलांची सेवा मायेच्या नात्याने न करता त्यांच्याकडे गुरुरूप म्हणून पाहून सेवा केल्यास साधना होते. श्रावणबाळाने आई-वडिलांची सेवा करून त्यांचे नाव अजरामर केले. घरच्या सेवा करतांना त्याच्याच जोडीला नामस्मरण, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, सेवा इत्यादी नेहमीच्या साधना घरचे सगळे करूनही करता येतात. त्यामुळे साधनेत प्रगती होईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment