कोणता जप करावा ?

१. व्यष्टी साधना : व्यष्टी साधनेला प्रारंभ करतांना कुलदेवतेचा (म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असल्यास कुलदेवीचा आणि त्यांपैकी एक असल्यास त्याचा किंवा तिचा), ती ज्ञात नसल्यास श्री कुलदेवतायै नमः ।, असा नामजप करावा. त्याच्याच जोडीला बहुतेक सर्वांनाच पूर्वजांचा त्रास असल्यामुळे श्री गुरुदेव दत्त । हा जपही करावा. गुरुमंत्र मिळाला असल्यास या दोन जपांऐवजी गुरुमंत्राचा जप करावा.

२. समष्टी साधना : ४ – ५ वर्षांत व्यष्टी साधनेची घडी बसली की, समष्टीसाठी, म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २०२३ पर्यंत श्रीकृष्णाचा जप करावा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर श्रीरामाचा जप करावा. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment